18 फुटांचा किंग कोब्रा पकडणारी मर्दानी; सचिन तेंडुलकरचा सॅल्यूट, भारतरत्नकडून हटके कौतुक

मुंबई : वन (वन) अधिकाऱ्यांचं किंवा वन खात्यातील कर्मचाऱ्याचं काम बाहेरुन अनेकांना भारी वाटतं, जंगलात राहायला मिळतं, वन्य प्राण्यांची सफर आणि काहीतरी वेगळं जीवन फॉरेस्ट खात्यातील अधिकाऱ्याचं वाटतं. मात्र, अनेकदा येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना जीवावर उदार होऊन धाडसाने आपलं काम करावं लागतं. केरळच्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यात एका धाडसी महिला वन अधिकाऱ्याने किंग कोब्राला फक्त 6 मिनिटांत रेस्क्यू करत सर्वांनाच चकित केलं. महिला अधिकाऱ्याचं धाडस पाहून सर्वानीच सलाम ठोकला आहे. हे काम केवळ धोकादायक नव्हते तर त्यासाठी संयम, आत्मविश्वास आणि अनुभवाचीही आवश्यकता होती. विशेष म्हणजे आता भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin tendulkar) मर्दानी अधिकारी रोशनी यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना सॅल्यूट केला आहे.

18 फूट लांबीचा हा किंग कोब्रा पाहिल्यानंतरही पारुथिपल्ली रेंजच्या फॉरेस्ट बीट ऑफिसर रोशनी अजिबात डगमगल्या नाहीत. केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पेप्पारा अंकुमारुथुमूत निवासी भागातून ओढ्यात आंघोळ करताना स्थानिकांना किंग कोब्रा दिसला होता, या विषारी सापाला रोशनी यांनी अत्यंत धाडसाने पकडले, असे ट्विट राजन माढेकर यांनी केलं आहे. त्यासोबत, वन अधिकारी रोशनी यांनी किंग कोब्रा पकडतानाचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. ”उत्साही, धाडसी आणि निडर राहणं हेच रोशनीच्या दिवसभरातील कामाचं मूल्यमापन” असल्याचे भारतरत्न मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. तसेच, सचिनने रोशनीच्या या धाडसाला सॅल्यूटही केला आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन सचिनने राजन माढेकर यांनी शेअर केलेला व्हिडिओ रिट्विट करत रोशनीच्या धाडसी कामाबद्दल तिचे कौतुक केले आहे.

6 मनिटांत किंग कोब्राचे रेस्क्यू ऑपरेशन

रोशनी यांनी केलेल्या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये महिला अधिकाऱ्याने काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते की, महिला अधिकाऱ्याने प्रथम संपूर्ण परिसराची काळजीपूर्वक तपासणी केली, नंतर विशेष उपकरणांच्या मदतीने हळूहळू किंग कोब्राला नियंत्रित केले आणि कोणतीही घाई न करता सुरक्षित ठिकाणी सोडले. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे आणि त्याचा सामना करणे सोपे नाही. हा साप खूप चपळ आणि धोकादायक आहे. तरीही, या महिला अधिकाऱ्याने हे बचाव अतिशय शांतपणे आणि निर्भयपणे पूर्ण केले.

हेही वाचा

मटण खाता म्हणून मराठी माणसांना घर मिळत नाही; आदित्य ठाकरेंनी सांगितला मराठीवरील अन्याय

आणखी वाचा

Comments are closed.