सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदा शेअर केला सून सानिया चांडोकसह फोटो, लेक अन् पत्नी देखील सोबत
Sachin Tendulkar Daughter-In-Law First Photo: भारतीय क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं त्याची होणारी सून आणि अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक हिच्यासोबत फोटो शेअर केला आहे. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, तेंडुलकर कुटुंबाकडून त्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले नव्हते. सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर हिच्या अकॅडमीच्या एका कार्यक्रमात सानिया चांडोक देखील दिसून आली. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर देखील सोबत पाहायला मिळाले. सचिनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरुन होणाऱ्या सुनेचा फोटो शेअर केला आहे.
सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा हिनं मुंबईत पिलेटस अकॅडमी सुरु केली आहे. या अकॅडमीला अशा पद्धतीनं तयार करण्यात आलं आहे, जिथ शरीर आणि मनाच्या क्षमतेला मजबूत केलं जाईल. दुबईच्या या फ्रँचायजीची मुंबईतील चौथी शाखा आहे. यावेळी सारा तेंडुलकरसह सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि सानिया चांडोक, अंजली तेंडुलकर यांची आई एन्नाबेल मेहता उपस्थित होत्या. सचिननं शेअर केलेल्या फोटोतील सानिया चांडोकच्या उपस्थितीनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे, ज्यात सानिया देखील आहे.
सचिन तेंडुलकरनं केलं सारा तेंडुलकरचं कौतुक
सचिन तेंडुलकरनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पालक म्हणून तुम्ही नेहमी अपेक्षा ठेवता तुमच्या मुलांनी ती गोष्ट मिळवावी,ज्याच्यावर त्यांचं प्रेम असतं. सारानं पिलेटस स्टुडिओ सुरु करणं, त्याच क्षणांपैकी एक आहे. सचिननं पुढं म्हटलं की सारानं हा टप्पा गाठला ज्यासाठी एक एक वीट लावल्याप्रमाणं मेहनत करत आणि आत्मीयतेनं हे मिळवलं.
आणखी वाचा
Comments are closed.