Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर (Saif ali khan) घरात घुसून हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्याद कैद झाला असून पायऱ्यांवरुन तो घरातून बाहेर पडतानाचा फोटो एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सैफ अली खानवर मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये अभिनेत्याच्या मानेवर गंभीर दुखापत झाली असून त्यास लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, खासगी सुरक्षा भेदून आणि प्रसिद्ध कलाकाराच्या बंगल्यात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनीही (Police) प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आता, आरोपीचा फोटो समोर आला असून सडपातळ, अंगात टी-शर्ट आणि पाठीवर बॅग घेऊन आरोपी घरात शिरताना दिसून येत आहे.
सैफ अली खानच्या घरी शिरलेला चोरटा हा मध्यरात्री 2.33 वाजता सैफच्या घरी आला होता. त्यावेळी, त्यांच्या घरातील लिमा म्हणजेच तैमुरला सांभाळणारी आया हिच्यासोबत त्याची झटापट झाली. त्यानंतर, अभिनेता सैफ आराडाओरड ऐकून धावला. त्यानंतर, चोरटा व सैफ अली खान यांच्या झटापड झाली. त्यामध्ये, सैफवर हल्ला करुन आरोपी पायऱ्यांवरुन पळून गेल्याची घटना मध्यरात्री घडली. सध्या या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून पोलिसांची 15 पथके शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. त्यामध्ये, गुन्हे शाखेची 8 पथके व मुंबई पोलिसांची 7 पथके तपासात कार्यरत आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर तपास केला जात आहे. आरोपीने वांद्रे स्टेशन गाठलं होतं, त्यामुळे त्याच दिशेने तपास होत आहे. हा फोटो सैफच्या इमारतीवरील 6 व्या मजल्यावरचा हा फोटो आहे. आरोपीने सैफच्या घरातून पळाल्यानंतर तो स्टेशन परिसरात नेमका कसा गेला, याचीही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
मुंबई पोलिसांनी चोरी, मारहाण व जिवे मारण्याच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्या संहितेच्या सेक्शन 311, 312, 331(4), 331(6), 331(7) BNS या कलमातर्गत सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीकडून अधिक तपास सुरू आहे. आरोपीचा उद्देश हा चोरी करण्याचा होता की हल्ला करण्याचा होता, की आणखी दुसरा होता याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.