निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नागपुरात धक्का, सलील देशमुख यांचा राजीनामा
नागपूर : राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं आहे.
सलील देशमुख : राजीनामा शरद पवार, सुप्रिया सुलेन्ना पाठवाला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार गटाचा पक्षाचा सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना राजीनामा पाठवला आहे.
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असताना सलील देशमुख यांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण दिलं आहे. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आराम करत आहे. त्यासाठी राजीनामा दिल्याचे सलील कुलकर्णी यांनी सांगितलं.
उद्या दुसऱ्या पक्षात जाणार आहे का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले उद्याची परिस्थिती काय असेल ते माहित नाही. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत असल्याचं सुतोवाच सलील देशमुख यांनी केलं. आता सलील देशमुख यांनी सध्या प्रकृतीचं कारण दिलं आहे. मात्र,येत्या काळात सलील देशमुख यांची राजकीय भूमिका काय असेल याबाबत चर्चा सुरु आहेत.
सलील देशमुख यांनी गेल्या 5 महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणामुळं राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देत आहे, असं जाहीर केलं. राजीनाम्याची प्रत त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे , जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना पाठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी ऑगस्ट महिन्यात नागपूरमधील मॅक्स रुग्णालयात जाऊन सलील देशमुख यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सलील देशमुख गंभीर आजारी असल्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रोहित पवार आणि माजी आमदार सुनील भुसारा यांनी सलील देशमुख यांची भेट घेतली होती.
दरम्यान, 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांच्याऐवजी सलील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र,काटोल विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांचा पराभव झाला होता. भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांच्याकडून सलील देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला होता. चरणसिंग ठाकूर यांना 104338 मतं मिळालेली तर सलील देशमुख यांना 65522 मतं मिळाली होती.
आणखी वाचा
Comments are closed.