“पेपरफुटीचा मुद्दा गंभीर, शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागले हे खूप…”, अखेर सलमान खान व्यक्त झाला
नीट पेपरफुटीच्या आरोपांविरोधात आणि आंदोलकांवरील पोलीस कारवाईविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मनोरंजन क्षेत्राकडून उघड पाठिंबा मिळत आहे. अशातच विद्यार्थ्यांवरील सरकारी अत्याचारांवर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान गप्प का आहे, या प्रश्नावर लोक उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. अखेर सलमानने एक्सवर पोस्ट शेअर करत व्यक्त झाला आहे.
सलमान खानने त्याच्या एक्स अकाऊंटवर लिहिले की, “हे एक अत्यंत शांततापूर्ण आंदोलन होते; त्याला हिंसक वळण लागले हे खूप दुःखद आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते. तर पेपरफुटी हा एक खूप गंभीर मुद्दा आहे. आपल्या देशातील मुले एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. याचा आनंद आहे असे त्याने व्यक्त केले.”
सलमान खान पुढे म्हणाला की, मी त्यांच्या कृतीचे मनापासून कौतुक करतो. त्यांनी समर्पण, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आपले भविष्य आणि एक उत्तम, सुशिक्षित हिंदुस्थान घडवण्याची आपली तळमळ दाखवून दिली आहे. हे आंदोलन किंवा निषेध योग्य मार्ग आहे आणि विद्यार्थ्यांनी ते शांततेने केले आहे. ते खूप धाडसी आणि शूर आहेत. शिक्षणाबद्दल प्रेरित आणि उत्कट असलेली ही पिढी हिंदुस्थानला गौरव वाढवेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. सलमानने पुढे लिहिले, “हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेमधील आहे; त्याचे राजकारण केले जाऊ नये. याचे श्रेय पूर्णपणे आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच जाते. तसेच सरकार या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
हे इतके शांततापूर्ण आंदोलन होते, इतके वाईट वाटते की त्याला हिंसक वळण घ्यावे लागले. जे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना दुखापत झाली आहे त्यांच्यासाठी माझे हृदय दुखावले जाते. पेपर गळती ही एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि मला हे जाणून आनंद झाला की आपल्या देशातील मुले चांगल्यासाठी एकत्र आली आहेत…
– सलमान खान (@BeingSalmanKhan) 22 जुलै 2026
सलमान खानने शेवटी लिहिले, ‘शिक्षण हा पुढचा ट्रेंड आणि फॅशन बनला पाहिजे आणि ते दरवर्षी अधिक लोकप्रिय आणि आकर्षक झाले पाहिजे, जेणेकरून इतर देशांतील लोक हिंदुस्थानात शिकायला येतील आणि हिंदुस्थान एक शैक्षणिक केंद्र बनेल. असे लिहीले आहे.
Comments are closed.