मुलगा झाला हो… अभिनेत्री समांथा रूथ प्रभू झाली आई; घरी चिमुकल्याचं आगमन, नावही केले जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. समांथाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या जोडप्याने 20 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

समांथाने शुक्रवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवजात बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. यात समांथा आणि राज यांनी आपल्या चिमुकल्याची नाजूक बोटे हातात धरलेली दिसत आहेत. या पोस्टद्वारे त्यांनी बाळाचा जन्म 19 नोव्हेंबर 2026 रोजी झाल्याचे सांगितले आहे.

इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा

Comments are closed.