पर्यटकाची टोपी गिळल्याने जगप्रसिद्ध ‘फिओना’ पाणघोड्याचा दुर्दैवी मृत्यू; सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयावर शोककळा!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील ओहायोच्या सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयातील जगप्रसिद्ध नाईल पाणघोडा ‘फिओना’ हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका पर्यटकाने हवेत उडवलेली टोपी चुकून गिळल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अखेर तिने प्राण सोडल्याची माहिती सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयाने दिली आहे. या घटनेमुळे प्राणिसंग्रहालयासह जगभरातील तिच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

प्राणिसंग्रहालयाचे संचालक डेव्ह जेनिक यांनी 19 नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या धक्कादायक घटनेची माहिती दिली. या बातमीची आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. आम्ही सर्वजण मोठा धक्का बसलेल्या अवस्थेत असून तिने शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र, तिचे शरीर साथ देईनासे झाले, असे त्यांनी सांगितले. नऊ वर्षांच्या या पाणघोड्याच्या शरीरातून विणलेली टोपी बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. आमच्या पथकाने तिला वाचवण्यासाठी पराकाष्ठा केली. पण अखेर तिची झुंज अपयशी ठरली. ती केवळ आमच्या कुटुंबाचाच नव्हे तर, जगभरातील असंख्य लोकांची लाडकी होती, असेही जेनिक यांनी नमूद केले. फिओनावर उपचार करणाऱ्या आणि तिला वाचवण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या प्रार्थना आणि विचारांमध्ये ठेवावे, असे आवाहन ओहायो येथील या प्राणिसंग्रहालयाने केले आहे.

प्रवक्त्या मिशेल कर्ले यांनी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी एका पर्यटकाने हवेत भिरकावलेली टोपी छतावरील पंख्यामुळे फिओनाच्या पिंजऱ्यात गेली आणि तिने ती चुकून गिळली. त्यानंतर तिच्या प्रकृतीच्या समस्या सुरू झाल्या. यापूर्वी 17 नोव्हेंबर रोजी प्राणिसंग्रहालयाने फेसबुक पोस्टद्वारे तिच्यावर चोवीस तास लक्ष ठेवले जात असल्याचे आणि ती टोपी शरीरातून बाहेर पडून पूर्ववत होईल, अशी आशा व्यक्त केली होती. कोलंबस प्राणिसंग्रहालयाच्या मदतीने तिची कोलोनोस्कोपी तसेच अल्ट्रासाऊंड करण्यात आले होते; ज्यामध्ये तिचे आतडे गुंतल्याचे आणि शरीर काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले होते.

जन्माप्रमाणेच तिचा मृत्यूही वेदनादायी ठरला. 2017 मध्ये ती सहा आठवडे आधीच जन्मली होती आणि तेव्हा तिचे वजन केवळ 25 पौंड होते, जे तिच्या प्रजातीच्या इतिहासातील सर्वात कमी जन्मवजन ठरले होते. कर्मचाऱ्यांनी तिची प्रगती जगासमोर मांडल्यानंतर ती अल्पावधीतच इंटरनेटवर मोठी सेलिब्रिटी बनली आणि दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तिचे वजन 90 पौंडांपर्यंत पोहोचले होते. ती पुढील जानेवारीत दहा वर्षांची झाली असती. फिओना ही एक देणगीच होती. तिच्याइतका लाडका प्राणी मी आयुष्यात पाहिला नाही; जन्मापासूनच ती बाटलीतील विजेसारखी होती आणि ती अनेक वर्षे आठवणीत राहील, अशा शब्दांत कार्यकारी अध्यक्ष थेन मेनार्ड यांनी 19 नोव्हेंबर रोजी आपल्या भावना व्यक्त केल्या. ती पुढील जानेवारीत दहा वर्षांची झाली असती. फिओना ही एक देणगीच होती, तिच्याइतका लाडका प्राणी मी आयुष्यात पाहिला नाही; ती कायम आठवणीत राहील, अशा शब्दांत कार्यकारी अध्यक्ष थेन मेनार्ड यांनी 19 नोव्हेंबर रोजी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments are closed.