राज-उद्धव युतीनंतर संदीप देशपांडेंचा पहिला वार, ‘बटोगे तो पिटोगे’ घोषणेला काऊंटर चॅलेंज, म्हणाल

मुंबई: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले तसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. अशातच मुंबईमध्ये “उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे…!  असे बॅनर लागल्याचे चित्र दिसून आले, याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी देखील प्रत्युत्तर देत त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट केली आहे, या पोस्टरबाबत बोलताना संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले, काल ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पोस्टर लावली त्याला उत्तर देत आहोत, मराठीच अपमान सहन केला जाणार नाही असा तो मेसेज सोशल मिडीयावरून दिला आहे. उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद नाही. भारतीय जनता पक्षाने जे काही एआय जनरेटर  माकडाने हे सगळं केलं आहे. हा विषय आता आला कुठे. जाणीवपूर्वक भाजप हे उत्तर भारतीय आणि मराठी वाद तयार करत असून त्यांना उत्तर भारतीय मत हवी आहेत, असंही देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.

अदानी फॅमिलीसाठी त्यांची युती आहे. हॅपिनेस इंडेक्स मुंबईकरांचा किती आहे. जनता खुश असेल तर ती प्रगती असते. एक अटल सेतू बांधला पण रस्ते खड्ड्यात आहेत. रोज उठून कोण जात अटल सेतूवरून, दोन-दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. गेली 25 वर्ष सत्तेत नव्हते का? पहारेकरी म्हणून घेत होते ना ते, काय झोपा काढत होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.(Sandeep Deshpande)

Sandeep Despande: शेलार यांना पक्षात कोण विचारत नसल्याने त्यांना रामदास आठवले चावले…

आशिष शेलारांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केला आहे. शेलार यांना पक्षात कोण विचारत नसल्याने त्यांना रामदास आठवले चावले आहेत असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. सत्तेतील लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं अमित साटम यांचा मेव्हणा, शेलार यांचा भाऊ, दरेकर यांचे भाऊ… अजून पण लिस्ट निघेल. बात निकलेगी तो लंबी जाएगी, असा इशाराही देशपांडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला.

अडाणीचा फॅमिलीसाठी महापालिका ताब्यात पाहिजे का हे पण सांगावं, असा टोला संदीप देशपांडेंनी अशिष शेलारांना लगावला आहे. तर सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टबाबत ते म्हणाले, कौतुक वाटलं म्हणून व्हिडिओ ट्विट केले. यांच्या डोक्यात हिरवा रंग आहे. आशिष कुरेशी ही मुंबईला लागलेली बुरशी आहेत. रझा अकादमीचा मोर्चा निघाला तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे होते. कोण आलं बाहेर, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांच्या मांडीला मंडी लावून बसले ते काय आम्हाला शिकवता. नवाब मलिकांना सोडविण्याचे काम फडणवीस यांनीच केले. ज्या भुजबळ यांच्यावर आरोप केले त्यांना मंत्रिपद दिले. हसन मुश्रीफांना त्यांनी घेतलं. किरीट सोमय्या गेले होते हातोडा घेऊन काय झालं त्याचं, असा संतप्त सवाल देशपांडेंनी यावेळी केला आहे.

संदीप देसपांडे: संदीप देशपांडेंची पोस्ट

संदीप देशपांडे यांनी मोजक्या शब्दात पोस्ट लिहून इशारा दिला आहे. याद राखा…उत्तर भारतीय बटोगे.. तो पिटोगे #BMC मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे… तो भी पिटोगे, असं देशपांडेंनी म्हटलंय.

आणखी वाचा

Comments are closed.