‘मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण’, संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, ‘वाल्मिक मो
संदीप क्षिरसागर: मी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनामाची मागणी करतोय .अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाहीत . वाल्मिक कराड मोठा नाही .त्याला वरदहस्त होता .त्यांना कोण भेटले , संरक्षण कोणी दिले ?त्यांना ऍडमिट कोणी केले ?असं सवाल करत या सगळ्यांचे सीडीआर तपासावे . धनंजय मुंडेंना मंत्री असल्याने संरक्षण असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) गटाचे संदीप क्षीरसागर (Sandeep kshirsagar) यांनी केलाय . फरार आरोपी कृष्णा आंधळे आता सापडणार नाही अशी माझ्या मनात शंका आहे . धनंजय मुंडे यांनीच सांगितलं की वाल्मिक कराड त्यांचे निकटवर्तीय आहेत .त्यामुळेच त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली .दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही ते बोललेत .अंजली दमानिया (Anjali Damadia) पुराव्यांशिवाय बोलत नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय .
काय म्हणाले संदीप क्षीरसागर ?
बीड जिल्ह्यातील विकास कामांसाठी पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये नियोजन समितीची बैठक घेतली .या बैठकीत बीडचा नगरपालिकेत एम एस सी बी चा थकबाकीवरील दोन वर्षात जे बोगस बिल उचलण्यात आले त्याचा लेखी तपशील अजित पवारांकडे दिल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले .आता बऱ्याच गोष्टी बाहेर येतील . दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनीच सांगितलंय वाल्मीक कराड माझं निकटवर्ती आहेत .त्यामुळेच त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली .मी पहिला दिवशी पासून मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करतोय .अंजली दमानिया पुरावा असल्याशिवाय बोलत नाहीत . वाल्मिक कराड मोठा नाही .त्याच्यावर वरदहस्त होता .त्यांना कोण भेटले कोणी संरक्षण दिले ? काही अटक झाले .. याबाबत मी पत्रदेखील दिले आहे .असे क्षीरसागर म्हणाले . (Sandeep Kshirsagar)
कृषिमंत्री असताना 88 कोटी रुपयांचा घोटाळा :अंजली दमानिया
दरम्यान, महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये कृषी मंत्री असताना तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर केला . केंद्र सरकारने 2016 साली शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून पैसे देण्याच्या आदेश काढले होते . या आदेशाला बगल देऊन शेती संबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करत घोटाळा केल्याचा आरोप केला . कृषी खात्यातील या घोटाळ्यांची कागदपत्र प्रसारमाध्यमांसमोर मांडताना अनेक आरोप त्यांनी केले .
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.