संगमेश्वर बस स्थानकासमोर रखडलेल्या सोनवी पुलाच्या कामामुळे पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकासमोर रखडलेल्या सोनवी पुलाच्या कामामुळे पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीचा फटका आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्राहकांना तसेच प्रवाशांना बसत असून, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
सोनवी पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी परिस्थिती अधिकच बिकट होत असून, पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस सोमा आव्हाड आणि मुजावर हे प्रयत्नशील असून, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Comments are closed.