शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘विकास
विकास लवांडे आणि संग्राम भंडारे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande Attack) यांच्यावर पुण्यातील आळंदी येथे शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी संग्राम भंडारे (Sangram Bhandare) आणि अक्षय कांचन यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संग्राम भंडारे यांनी एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणाबाबत भाष्य केले. विकास लवांडे (Vikas Lawande) हा आमच्या गुरुवर्यांचा अपमान करायचा, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर शाई ओतली. यापुढे त्यांनी आमच्या गुरुवर्यांचा पुन्हा अपमान केला तर आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा संग्राम भंडारे यांनी दिला. (Pune Crime news)
हा विकास लवांडे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी मला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत असेल तर, त्यांना घुसखोर आणि धर्मांध म्हणत असेल तर आम्ही ते कसं सहन करु. गेल्या अनेक दिवसांपासून तो आमच्या वारकरी संप्रदायावर टीका करत आहे, आरोप करतोय. आमच्यासारख्यांना काय भिडायचंय ते भिडावं ना, पण आमच्या गुरुवर्यांवरील टीका आम्ही सहन करु शकत नाही. ‘गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माजा, गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रैलोक्या.’ त्यामुळे विकास लवांडेच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली. बाकी तो जे खोटारेड आरोप करतोय, मला पिस्तुल लावलं, गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तुल लावावी. ‘तुका म्हणे संता पिडतील खळ, घेती तोंड काळे करुनिया’, आम्ही त्याचे तोंड काळे केले आहे. आम्ही चांगल्याला चांगले, वाईट आहोत. आम्ही शिवछत्रपतींचे मावळे आहोत आणि ज्ञानेश्वर-तुकोबांचे वारकरी आहोत. आम्ही आता काळी शाई ओतून त्याचा निषेध केला आहे. यापुढे त्याने आमच्या गुरुवर्यांचा अपमान केला तर विकास लवांडे यांनी यापुढच्या प्रसंगांना सामोरे जायची तयारी ठेवावी, असे संग्राम भंडारे यांनी म्हटले.
Pune Crime news: नी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून… विकास लवांडे काय म्हणाले?
शाईफेक आणि हल्ल्याबाबत एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना विकास लवांडे म्हणाले की, माझी आज प्रवचन सेवा होती. पुण्याजवळील हवेली तालुक्यात लोणी काळभोरच्या जवळ एका गावामध्ये, माझं आठ वाजता प्रवचन होतं, प्रवचन सेवा संपवून मी दहा वाजता बाहेर पडलो, मला रस्त्यात एकांतात तीन- चार गाड्या एकदम आल्या, त्यांनी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून खाली उतरवलं, त्यामध्ये संग्राम भंडारी हा व्यक्ती मी ओळखला, उरुळी कांचनमधील अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक ओळखायला आला बाकीचे सगळे अनोळखी गुंड प्रवृत्तीचे लोक होते, त्यांनी मला गाडीतून उतरवल्यानंतर धक्काबुक्की करत स्मशानभूमीच्या शेजारी नेलं, मला तिथे त्यांनी रिवॉल्वर दाखवली. आवाज करायचा नाही वगैरे सांगितलं. तुझा मी खात्मा करणार आहोत असेही ते बोलत होते, आमच्या गुरूला तू का बोललास. असंही ते मला बोलले त्यानंतर माझ्या अंगावर एकदम दोन-तीन जणांनी शाईने भरलेल्या बाटल्या ओतायला सुरूवात केली, मला धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ते निघून गेले, आजूबाजूचे लोक जमायला लागल्यावर ते लोक पळून गेले, तुझा खात्मा करणार, सावध रहा असंही त्यांनी वक्तव्य केलं, असं विकास लवांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
तर वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही धर्मांध विचाराचे लोक आहेत, वर्ण वर्चस्ववादी लोक आहेत, जे वारकरी संप्रदायाचे नाहीत अशा लोकांना माझ्या भूमिकेने कदाचित ते अस्वस्थ होत असावे, त्याच्यातूनच संग्राम भंडारी यांनी संगमनेरमध्ये हैदोस घातला होता. त्यावेळी तो गुंड घेऊन आला होता, वारकरी संप्रदायातील घुसकरांच्या संदर्भात वक्तव्यामुळे तो आमच्या गुरूला असं का बोलला वगैरे बोलत होता, त्यामुळेच त्याने माझ्यावर हल्ला केला असावा, लोक तिथे जमायला लागले म्हणून मी वाचलो. माझा ड्रायव्हर सोबत होता त्याच्यामुळे मी वाचलो. नाहीतर आज माझा खात्मा झाला असता, असे विकास लवांडे यांनी म्हटले आहे. जे हल्लेखोर होते, त्यांची आणि माझी काही ओळख नाही. मी त्यांना ओळखत नाही. मी आत्ता लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे, पोलीस माझी फिर्याद घेत आहेत, मी पोलीस स्टेशन मध्ये बसून आहे, जोपर्यंत त्या सर्वांना अटक होत नाही जे काही 15 जण होते, तीन-चार गाड्या होत्या, तोपर्यंत मी इथून उठणार नाही, माझा सत्याग्रह आहे, त्यांना अटक होईपर्यंत सुरू राहील असेही पुढे विकास लवांडे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.