प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण..; संजय गायकवाडांना उपरती, भूमिकेवर ठाम
बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay gaikwad) यांनी दिवंगत गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या प्रशांत आंबी यांना फोन करुन शिवागाळ केली होती, तसेच धमकी देत शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का करतो, असे म्हणत धमकीही दिली होती. मात्र, केवळ पुस्तकाचे कव्हर पेज पाहून संतापलेल्या संजय गायकवाड यांनी पुस्तक वाचले नसून त्यांना छत्रपती शिवराय कळालेच नाहीत, असे म्हणत समाज माध्यमांवरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राजकीय नेत्यांनी (Buldhana) देखील त्यांच्याबद्दल सावध भूमिका घेतल्यानंतर आता त्यांनी संबंधित प्रकाशक आंबी यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणाबद्दल दिलगीरी व्यक्त केली, पण छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करण्याच्या मतावर आपण ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलं.
शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. सोशल मीडियावर या घटनेवरुन संजय गायकवाड यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न विचारण्यात आले. तर, प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही पोलिसात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. तसेच, महायुतीमधील राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्या फोनबद्दल सावध भूमिका घेतली होती. अखेर, शिवीगाळीच्या घडल्या प्रकाबद्दल त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, ही आपली ठाम भूमिका असल्याचेही संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
शिवीगाळ प्रकाराबद्दल दिलगिरी
शिवाजी कोण होता, या पुस्तकातील एकेरी उल्लेखांवर आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा असल्याचे मत व्यक्त केले. अलीकडील वादात आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करत मनापासून दिलगिरीही व्यक्त करतो. तसेच, छत्रपती शिवरायांविषयी निष्ठा आणि सन्मान कायम ठेवत संबंधितांनी योग्य ती दुरुस्ती करावी. ज्यांना बुलढाण्यात येऊन हे पुस्तक वाचायचे आहे, त्यांनी ते वाचावे पण एकेरी उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख करावा. महाराजांचा अपमान करुन करोडो हिंदूंचा अपमान करू नये अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
मी संजय गायकवाड यांच्याशी बोलतो
संजय गायकवाड यांनी त्या पुस्तकासंदर्भात नेमकी कशाबाबत भूमिका मांडली, याबाबत त्यांच्याशी बोलावे लागेल. संजय गायकवाड यांनी ते पुस्तक वाचलं की नाही माहीत नाही. मी माहिती घेऊन त्यांना काय आक्षेपार्ह वाटलं ते विचारेल, मी देखील पुस्तक वाचतो असे उदय सामंत म्हणाले. शिवाजी कोण होता? हे पुस्तक मी देखील वाचलेले नाही, पुस्तक वाचलं की त्यांची भूमिका कशाबद्दल होती याबाबत चर्चा करेल, असे शिवसेना नेते तथा मत्री उदय सामंत यांनी म्हटले.
हेही वाचा
संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटलं ते विचारणार, मी देखील ते पुस्तक वाचलं नाही : उदय सामंत
आणखी वाचा
Comments are closed.