RBI प्लास्टिकच्या नोटा छापणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले…

पॉलिमर चलन मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीकडून रेपो रेटमध्ये बदल न करता 5.25 टक्के कायम ठेवण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये आरबीआयकडून प्लास्टिक किंवा पॉलिमरच्या नोटा चलनात आणल्या जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. ते म्हणाले तो विषय सध्या विचाराधीन असून प्रारंभिक टप्प्यात आहे. यामुळं आरबीआय प्लास्टिकच्या नोटांबाबत विचार करतेय हे स्पष्ट झालंय. मात्र, आरबीआय प्लास्टिकच्या नोटा कधी आणणार हे मात्र निश्चित झालं नाही.

आरबीआयनं प्लास्टिक नोटांवर काय म्हटलं?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांना आज प्लास्टिकच्या नोटांसदर्भात विचारण्यात आलं आहे. यावर बोलताना संजय म्हलोत्रा यांनी प्लास्टिकच्या नोटांबाबत आरबीआयचा विचार सुरु असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत, असं म्हटलं. मात्र, पॉलिमरच्या नोटांचा विषय सध्या विचाराधीन असल्याचं देखील ते म्हणाले. पॉलिमरच्या नोटांचा प्रस्ताव विचाराधीन असून त्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं म्हलोत्रा म्हणाले. पॉलिमरच्या नोटांचे फायदे आणि नुकसान याबाबत विचार सुरु असून तो विषय विचाराधीन असल्याचं देखील संजय म्हलोत्रा म्हणाले.

2012 मध्ये पॉलिमर नोटांचा प्रकल्प अयशस्वी

भारत सरकारनं फेब्रुवारी 2012 मध्ये देशातील 5 शहरांमध्ये पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटांचा  पायलट प्रोजक्ट राबवला होता. कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरात 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी एटीएम आणि मशीनच्या कारणांमुळं अडचणी आल्यानं  तो प्रकल्प थांबवण्यात आला होता.

पॉलिमर करन्सी म्हणजे काय?

पॉलिमर करन्सीमध्ये पॉलिमर बँक नोट लवचिक प्लास्टिक सबस्ट्रेटपासून बनवल्या जातात. त्या नोटा  Bi-axially Oriented Polypropylene (BOPP) पासून बनवल्या जातात. त्या कार्ड सारख्या जाड नसतात. यामुळं त्याची कागदाच्या नोटांसारखी घडी करता येते.

प्लास्टिकच्या नोटांची वैशिष्ट्ये

प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असतात. त्या नोटांचा कागदाच्या नोटांपेक्षा जास्त काळ टिकतात. यामुळं वारंवार नोटांची छपाई करावी लागत नाही.

कोणत्या देशात प्लास्टिक नोटा चलनात

ऑस्ट्रेलियानं सर्वात अगोदर प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरु केला. त्यांच्यानंतर कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, थायलँड, इंडोनेशिया, रोमानिया या देशात प्लास्टिकच्या नोटांचा वापर केला जातो. भारतात अजून प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरु झालेला नाही.  भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या जातात का ते पाहावं लागेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.