दिल्लीत मोदी-शाहांनी राष्ट्रपतींची भेट घेताच संजय राऊतांनी मोठा बॉम्ब फोडला; म्हणाले, सप्टेंबर
नरेंद्र मोदी आणि अमित शाहवरील संजय रौत: दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, रविवारी (दि. 3) पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी एकाच दिवशी, थोड्याच वेळाच्या अंतराने घेतलेल्या या भेटींमध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. आता या भेटींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय. सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, सध्या आपल्या देशात राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत? हे आपल्याला माहित आहे. राष्ट्रपतींच्या सल्ल्याने सरकार किती काम करते हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वाची बैठक आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या बैठकीत सुद्धा महत्त्वाच्या भविष्यातल्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जे सातत्याने सांगितले जात आहे की, सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. आम्हालाही वाटतं की, सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.
ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचे : संजय राऊत
संजय राऊत पुढे म्हणाले की , राष्ट्रपतींना पंतप्रधान भेटणे हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतींना ते भेटायला बोलवत नाही, ही बातमी आहे. या देशात सध्याच्या कामाची एकंदरीत परिस्थिती पाहता काहीही होऊ शकते. काय होतंय ते पाहू, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
गडकरींच्या समजदारीला सलाम : संजय राऊत
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांधी व नेहरूंच्या दोन गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनाची आवश्यकता आहे, असे नेहरू म्हणायचे. तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून उत्पादन वाढविले पाहिजे, असे गांधीजींचे विचार होते. आमचेदेखील सर्वात जास्त प्राधान्य रोजगार निर्मितीवरच आहे, असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, सध्या सरकारमध्ये सर्वात समजदार मंत्री नितीन गडकरी आहेत. पण नेहरूंचे नाव घेतलं म्हणून त्यांच्यावर कारवाई तर होणार नाही ना? नेहरूंचा किती द्वेष असावा. मुंबईतील मेट्रो स्टेशनला सायन्स सेंटर नाव दिले आहे, तेथून नेहरूंचे नाव काढले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हटले नाही. तर तेथील मेट्रो स्टेशनला राष्ट्रीय उद्यान म्हटले आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तर गडकरींच्या समजदारीला सलाम करतो, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=brdhuv33ls8
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.