निवडणूक आयुक्तांना हरकाम्या समजू नका, संविधानाचा सन्मान राखा; संजय राऊत यांचा फडणवीसांवर घणाघात
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्यात यावे यासाठी इंडिया आघाडीसह विविध संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करत असून विरोधकांना मतदार याद्यांमधील शुद्धीकरण नको असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
एसआयआरही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. पण त्या यादीतील मृत पावलेल्या मतदारांच्या ठिकाणी भाजपचे लोक जाऊन मतदान करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. अनेक लाखो जिवंत लोकांना मृत दाखवलं आहे. यातील काही मतदारांचं सत्य राहुल गांधी, आदित्य ठाकरे यांनी पीपीटीद्वारे दाखवलं. याला शुद्धीकरण म्हणतात का? शुद्धीकरणाची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावी, अशी टीका संजय राऊत केली.
“निवडणूक आयुक्तांना हरकाम्या समजू नका”
देवेंद्र फडणवीस यांनी आपण एक सुशिक्षित मुख्यमंत्री असल्याचे भान ठेवले पाहिजे. आणि संविधानाचा देखील सन्मान केला पाहिजे. निवडणूक आयुक्तांना घरघडी आणि हरकाम्या समजून नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्याना सुनावले.
अति डाव्या विचारसरणीची मानसिकता प्रस्थापित करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न – फडणवीस यांचा आरोप
Comments are closed.