जगदीप धनखड गायब, संजय राऊतांनी रशिया पॅटर्नचा संशय व्यक्त केला, नेमकं काय घडलं?

जगदीप धनखारवरील संजय रौत: जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यापासून म्हणजेच 21 जुलैपासून आत्तापर्यंत ते कुठे आहेत? त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे? ते काय करत आहेत? ते कोणासोबत आहेत? त्यांचा मुक्काम कुठे आहे? ते बरे आहेत ना? मुळात ते आहेत ना? त्यांना कुठे गायब केले आहे का? असे सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

संजय राऊत म्हणाले की, या देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे 21 जुलैपासून बेपत्ता आहेत. या देशाची उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे. 21 जुलैला ते सकाळी राज्यसभेत आमच्या समोर आले. त्यांची आणि आमची चर्चा झाली. त्यांनी राज्यसभेत काही आदेश दिले. नंतर सभागृह स्थगित झाले. त्यांची प्रकृती उत्तम आणि खणखणीत होती. त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा वाजेनंतर अचानक मीडियावर बातमी झळकली की, जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. हे आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे.

संजय राऊतांनी रशिया पॅटर्नचा संशय व्यक्त केला

इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो. पण, जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजेच 21 जुलैपासून आत्तापर्यंत ते कुठे आहेत? त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे? ते काय करत आहेत? ते कोणासोबत आहेत? त्यांचा मुक्काम कुठे आहे? ते बरे आहेत ना? मुळात ते आहेत ना? त्यांना कुठे गायब केले आहे का? अशा शंका आमच्या मनात येत आहेत. जगदीप धनखड कुठे गेले हे कुणी सांगू शकत नाही. देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठावठिकाणा कुणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. आपल्याला नको असलेले नेते अशा प्रकारे  गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे. त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना कपिल सिब्बल हे त्यांना भेटले. तेव्हा आम्ही या विषयावर चर्चा केली. जगदीप धनखड यांचं काय करायचं? ते कुठे आहेत? याविषयी चर्चा झाली. ज्यावेळी लोक अशा प्रकारे मिळत नाहीत तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका करू शकतो, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले.

मोदी-शाहांकडून जैन समाजाला हिंसक बनवण्याचं काम

दरम्यान, महाराष्ट्रात कबुतरांचा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे. अंबादास दानवे यांनी दादरमध्ये महिला चाकू हातात घेऊन आंदोलन करत होत्या. परंतु, कोणावरही कारवाई झाली नाही, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो. संयमी मानला जातो. त्यांच्या हातात चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर हिंसक आणि आक्रमक होत असतील तर ते त्यांच्या धर्माचा, भगवान महावीर यांचा विचार पाळत नाहीत. या समाजाला हिंसक बनवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह करत आहेत. त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना दिसत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=j8vrb9txuyi

आणखी वाचा

अन्यथा कोर्टात जाणार! ‘लापता लेडीज’ बद्दल ऐकलं होतं, पण ‘लापता’ उपराष्ट्रपती पहिल्यांदाच ऐकतोय, तडकाफडकी राजीनाम्यानंतर जगदीप धनखड गायब, थेट अमित शाहाकंडे विचारणा

आणखी वाचा

Comments are closed.