भाजपला नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्यात मुख्यमंत्रीपदी आणि पंतप्रधानपदी महिलेला संधी द्यावी – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्ञानेश कुमार यांच्यासाठी भारतरत्न हा छोटा पुरस्कार आहे, त्यांना नोबेल मिळाला पाहिजे असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्यात मुख्यमंत्रीपदी आणि पंतप्रधानपदी महिलेला संधी द्यावी असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 11 वर्षांपूर्वी हा हिंदुस्थान जगातला सर्वोत्तम देश होता असं मानलं जायचं. आणि भाजपचं सरकार आल्यापासून या देशाचा नरक झाला असेल तर मोदींनी 140 कोटी देशवासियांना नरेंद्र मोदींनी नरकात ढकललं आहे. असं कटू सत्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदींचे मित्र माय फ्रेंड डोलांड यांनी मांडले आहे. ते मोदींचे मित्र आहेत देशाचे आहेत की नाहीत हे माहित नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे कटू सत्य मांडलेले आहे. आणि त्यामुळे भाजपने नरेंद्र मोदींनी तरी पत्रकार परिषद घेऊन हा देश नरक नसून नंदनवन आहे हे सांगावं. हा देश नंदनवन होतं आणि या नंदनवनाचे नरक करण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या सरकारने गेल्या 11 वर्षात केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ती पक्की माहिती आहे असं दिसतंय असे संजय राऊत म्हणाले.

तसे महिला आरक्षण विधेयका प्रकरणी संजय राऊत म्हणाले की, भाजपचं नारी शक्ती हे ढोंग आहे. नारी शक्तीची एवढीच काळजी आहे तर भाजपने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला बसवावी. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावं. केंद्रातसुद्धा पंतप्रधानपदी एका महिलेला विराजमान करावं, त्यामुळे आपोआप नारीशक्तीला ताकद मिळेल असे संजय राऊत म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांच्यासाठी भारतरत्न हा छोटा पुरस्कार आहे, त्यांना नोबेल मिळाला पाहिजे. भाजपची एवढी सेवा केल्यानंतर फक्त भारतरत्न मिळणार असेल तर हा त्यांचा अपमान आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना माझी विनंती आहे की दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी आणि सांगांवं की नोबेल पुरस्काराच्या समितीला पत्र लिहावे आणि ट्रम्प यांनी ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहण्यासाठी सांगावे असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Comments are closed.