जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला; म्हणाल

Sanjay Raut on Jayant Patil Meet मराठी: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) पुन्हा एकदा अत्यंत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली, ज्यापैकी अर्धा तास जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात ‘बंद दाराआड’ गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Raut on Jayant Patil Meet मराठी : संजय राऊत?

या भेटीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, “ते लोक रामदास आठवले यांना भेटले तर तुम्ही त्यांना आठवले यांच्या पक्षात जाणार असे म्हणणार का? महाराष्ट्र आणि देशात इतके राजकीय पक्ष बनले आहेत की, कोणी ना कोणी कोणाशी भेटत असतात. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सर्व पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत असतात. ते ‘फ्री बर्ड्स’ आहेत, त्यांना भेटू द्या,” असे त्यांनी म्हटले आहे.

Jayant Patil Meet मराठी: नेमकी काय झाली बंद दाराआड चर्चा?

जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड नेमकी कोणती गुप्त चर्चा झाली, याबाबत सध्या अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी तेथे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हेदेखील उपस्थित होते. या पाठोपाठ काल थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राज्यात काहीतरी मोठे राजकीय फेरबदल होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

NCP Sharad Pawar: शरद पवारांचा गट NDA मध्ये सामील होणार?

सध्या राजकीय वर्तुळात अशा चर्चांना उधाण आले आहे की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये (NDA) सामील होऊ शकतो. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान स्वतः शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. जर शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सामील झाला, तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील यांना अत्यंत महत्त्वाचे असलेले अर्थ खाते म्हणजेच अर्थमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

https://www.youtube.com/watch?v=y9ijbZt3deA

आणखी वाचा

Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.