फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांची भा

महायती तिरंगा यात्रा वर संजय राऊत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या तिरंगा यात्रेवरून केली आहे. तर आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊत म्हणाले की, तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला.  या लोकांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे, जेपी नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा

संजय राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी. त्यांना कळतं का? युद्धबंदी, शस्त्रसंधी काय असते? आमदार-खासदार विकत घेऊन सरकार बनवण्या इतकं सोपं आहे का? ते निवडणूक आयोगाला हातात धरून पक्ष ताब्यात घेण्याइतकं सोपं नाही. युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचलं आहे. आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र राहायला, त्यांना भारताची मदत हवी होती, तेवढी सुद्धा तुम्ही केली नाही. मिस्टर मोदी आणि अमित शाह तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कुंवर विजय शाहांना अटक करा

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर दरम्यान मीडिया ब्रीफिंगमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरुद्ध स्वतःहून एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने अशा प्रकारची देशद्रोही विधान केली. त्यांनी अनेक प्रकारची अशी विधान केली आहेत. हिंदू-मुसलमानांमध्ये भांडण लावणे. सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान किंवा आतंकवादी म्हणणं, हा देशद्रोह आहे, त्यांना अटक केली पाहिजे. हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मग हे अजून मंत्रिमंडळामध्ये कसे? शिवराज सिंह यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशी विधान केली आहे. त्यांना नुसता बरखास्त नाही तर अटक केली पाहिजे. त्यांच्या पक्षाने देखील त्यांची हकालपट्टी केली पाहिजे.हे मागणी आम्ही सगळे करत आहोत पण भाजपा करणार नाही, असे त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=VYR7M-5OQ3E

आणखी वाचा

India Pakistan Nuclear weapons: पाकिस्तानची आण्विक अस्त्रं नष्ट करण्यासाठी भारतीय वायूदलाने हल्ला केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची घाईघाईत मध्यस्थी: न्यूयॉर्क टाईम्स

अधिक पाहा..

Comments are closed.