हरदीप सिंग पुरींच्या मुठीत अशी कोणती सिक्रेट्स आहेत की मोदी सरकार कारवाईला घाबरतंय? संजय राऊत यांचा जळजळीत सवाल
जगातील अनेक देशांतील सत्ता सिंहासनांना हादरे देणाऱ्या एपस्टीन फाईल्समुळे ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ आले आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीनशी संबंध आणि बलात्काराच्या आरोपांत अडकलेले ब्रिटनचे माजी प्रिन्स अॅण्ड्र्यू यांना गुरुवारी अटक करण्यात आली. वाढदिवशीच पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेतले. ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्याला पहिल्यांदाच अटक झाली असून या अटकेमुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.
मिस्टर मोदी, संसदेची इमारत बदलून किंवा साऊथ ब्लॉकवरून ‘सेवातीर्थ’ला नेल्याने गुलामी संपत नाही, कायदा सर्वांसाठी समान कधी होणार? हरदीप सिंग पुरींच्या मुठीत अशी कोणती सिक्रेट्स आहेत की मोदी सरकार कारवाई करायला घाबरत आहे? असे जळजळीत सवाल संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले की, प्रिन्स अॅण्ड्र्यू यांना अटक झाली असून ते सध्याचे राजे किंग चार्ल्स यांचे सख्खे भाऊ आहेत. एपस्टीनमध्ये त्यांचे नाव आल्यावर त्यांच्यावर आधीही कारवाई झाली होती, सार्वजनिक हित धोक्यात आणणे, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे आणि एपस्टीन प्रकरणात देशाची गोपनीय माहिती उघड करणे या कारणास्तव आधी त्यांची सर्व पदं काढून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना निवासस्थानातून बाहेर काढले आणि गुरुवारी लंडन पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना अटक केली. याबापासून हिंदुस्थानी राजकारण्यांनी आणि राज्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे.
हिंदुस्थानातील अनेक राजकारणी आणि उद्योगपतींची नावे एपस्टीन प्रकरणात आली आहेत. नरेंद्र मोदींनी गुलामीच्या खुणा पुसायच्या म्हणून ब्रिटिशांनी बनवलेल्या संसदेसमोर नवीन संसद बनवली. साऊथ ब्लॉक हे पंतप्रधानांचे कार्यालय सेवातीर्थ या नवीन कार्यालयात नेले. पण त्याच ब्रिटनने राजघराण्यातील राजपुत्रावर कारवाई करत त्याला तुरुंगात पाठवले. पण दुसरीकडे एपस्टीन प्रकरणात रेकॉर्डवर आलेले काही मंत्री आपल्याबरोबर वावरताहेत, फिरताहेत आणि मंत्रिमंडळात आहेत. तुम्ही कसल्या गुलामीच्या गोष्टी करताय? असा सवाल राऊत यांनी केला. कायदा सर्वांसाठी समान असल्याने ब्रिटनला द ग्रेट ब्रिटन म्हणतात. तिथे लोकशाहीत जनतेच्या हक्कांचे संरक्षण केले जाते. हिंदुस्थानात नेमके उलट आहे. नुसती संसदेची इमारत बदलून आणि साऊथ ब्लॉकचे कार्यालय बदलून गुलामी नष्ट होत नाही. उलट तुम्ही देशाला जास्त गुलाम करतात मिस्टर नरेंद्र मोदी, असेही राऊत म्हणाले.
एपस्टीन फाईलमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव आले. त्यांना मोदी हात लावत नसतील तर हरदीप सिंग पुरी यांच्या मुठीकडे काहीतरी महान सिक्रेट्स असावेत आणि त्याला घाबरून मोदी सरकार कारवाई करत नसावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, एपस्टीन फाईलमध्ये नाव आल्याने इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी बिल गेट्स यांच्या लॅबमधून निर्माण होणाऱ्या सर्व उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्याच बिल गेट्स यांचे आम्ही स्वागत करतो.
मोदीजी,
इंग्लंड सूपर पॉवर शायद नही हो
पण “या देशात कायदा सर्वांसाठी समान आहे.”
साउथ ब्लॉक ते “सेवातीर्थ”
काहीही होणार नाही,
@PMOIndia
@narendramodi@
@BJP4India pic.twitter.com/R6i2tPrspu— संजय राऊत (@rautsanjay61) 19 फेब्रुवारी 2026
Comments are closed.