“ठाण्यातील शिंदेंचे ‘मिधे’ पोलीस दल बरखास्त व्हायला पाहिजे; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेला अटक झाली नाही तर…”, संजय राऊत यांचा इशारा
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक करण्याच्या मागणीसाठी पूर्णेकर समर्थक आणि ठाणेकर रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी रात्री पूर्णेकर समर्थकांनी घोडबंदर रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्या, सूत्रधारांना अटक करा, एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या आणि ठाणे भयमुक्त करा या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्वपक्षीयांचे महाआंदोलन होणार आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून ठाण्यातील शिंदेंचे मिंधे पोलीस दल बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.