मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजा तस्करीचा पर्दाफाश, बँकॉकहून आलेल्या महिलेला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या तामिळनाडूतील 39 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेकडून 955 ग्रॅम हायड्रोपोनिक वीडसह जप्त करण्यात आले आहे. सुधा वेलमुरुगन असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मंगळवारी पहाटे ही कारवाई केली. बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरतल्यानंतर आगमन कक्षाच्या गेटजवळ अधिकाऱ्यांनी सुधाला अडवले. यानंतर तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान, दोन काळ्या रंगाच्या व्हॅक्यूम-सील्ड प्लास्टिक पिशव्या सापडल्या. ज्यांच्या आत पुन्हा पारदर्शक व्हॅक्यूम-सील्ड पाकिटे होती.

ही पाकिटे उघडल्यावर त्यात हिरव्या रंगाचा, वाळलेला पालापाचोळा आढळून आला, ज्यातून तीव्र आणि उग्र दुर्गंधी येत होती. चौकशी केली असता संबंधित महिलेने हा हायड्रोपोनिक वीड असून त्याचे वजन 955 ग्रॅम असल्याचे कबूल केले. यानंतर तिला एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत समन्स बजावून तिचा जबाब नोंदवण्यात आला. सहज व जलद पैसे कमवण्यासाठी आपण हे काम केल्याचे महिलेने चौकशीत कबूल केले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

Comments are closed.