पडद्यामागे पटकथा लिहिली जाणार…; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर संजय राऊतांचं म
राज ठाकरे आणि उधव द दक्रॅय वर संजय रौत: विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला केवळ 20 जागांवर यश मिळालं, तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळवता आली नाही. यानंतर दोघा बंधूंसाठीच राजकीय अस्तित्वाची लढाई सुरु झाली. गेल्या महिन्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांनीही सूचक विधानं करत संभाव्य मनोमिलनाचे संकेत दिले. त्यानंतर, दोघेही परदेशात रवाना झाले आणि ठाकरे बंधूंच्या युतीविषयीची चर्चा काहीशी थंडावली. मात्र, आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
पडद्यामागे पटकथा लिहिली जाणार…
संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला काहीच माहित नाही काय घडतंय? नेत्यांच्या स्टेटमेंटवरून तुम्ही बातम्या करताय.
पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाणार आहे. या सगळ्याचं बाळंतपत होऊ द्या. सगळं व्यवस्थित सुरु आहे. आम्ही सकारात्मक आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
मी अनेक गोष्टी लिहिल्या असत्या पण…
दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कारागृहात लिहिलेलं ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत विचारले असता मी जे काही पुस्तकात लिहिलं त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. हे माझ्या तुरुंगातले अनुभव आहेत. मला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं. अनेक गोष्टी मी भूतकाळात पाहिल्या, अनुभवल्या, ऐकल्या. मी अनेक गोष्टी लिहिल्या असत्या पण, हाहाकार माजला असता. पण, मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त आहे. त्यामुळे मी मर्यादा पाळल्या, असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी संकटकाळात फोन करायला पाहिजे होता
मी तुरुंगात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी एक तरी फोन करायला पाहिजे होता, असा संदर्भ तुम्ही दिलाय. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी संकटकाळात फोन करायला पाहिजे होता. त्याने एक आधार मिळतो. संकटाचा डोंगर आमच्या कुटूंबावर पडला होता.
जेवढं मला शक्य आहे, तेवढं मी लिहिलं
कारागृहात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लिहिलेलं ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना कसं वाचवलं?, याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेली मदत त्याची विस्तृत माहिती संजय राऊत यांनी मांडली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी जे काही लिहलंय ते 100 टक्के खरं आहे. 35 मिनिटाची फोनवरील चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे यांची ती मी चर्चा टाकली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे आदराचे संबंध सगळ्यांसोबत आहे. जेवढं मला शक्य आहे, तेवढं मी लिहिलं आहे.
नाहीतर तुम्ही तुरुंगात जाल, असा मला सांगितलं
मविआचे सरकार पाडायाला मदत करा, अन्यथा तुरुंगात जा, असं भाजपच्या नेत्याने तुम्हाला म्हटल्याचा दावा तुम्ही केलाय. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत भाजपचे जेष्ठ नेते मला सांगायला आले होते. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार आहोत. दिल्लीत आमचा निर्णय झाला आहे आणि मला शांत राहायला सांगितलं. नाहीतर तुम्ही तुरुंगात जाल, असा मला सांगितलं. त्यानंतर मी हे सगळं व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सांगितलं, असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=p_z36toz6Si
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.