खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
संजय राऊत: राज्यात ऑपरेशन टायगरला (Operation Tiger) सुरुवात झाली असून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार हे दिल्लीत दाखल झाले असून एकनाथ शिंदेंही रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत दाखल झालेले ठाकरेंचे खासदार हे बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अशातच या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री 15-15 कोटींचं अॅडव्हान्स येणार असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एका फूट पडण्याची शक्यता आहे. सहा खासदार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत या घडामोडींवर भाष्य केलं आहे. अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे, असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केलं आहे.
माझ्या स्वप्नातील पैसा…पैसा!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!@Dev_Fadnavis— संजय राऊत (@rautsanjay61) 16 जून 2026
सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर
शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर या पाच खासदारांची चर्चा आहे. मात्र शिंदेंना पाठिंबा देणारा ठाकरेंचा सहावा खासदार नेमका कोण याची माहिती मात्र समोर आली नाही
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
शिंदेंचे ऑपरेशन टायगर पूर्णत्वास जाणार असल्याची चर्चा
दरम्यान, येत्या दोन दिवसात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच ठाकरे गटाचे सहा खासदार हे नॉट रिचेबल झाले आहेत. ते दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात आता शिंदेंचे ऑपरेशन टायगर पूर्णत्वास जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या:
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Comments are closed.