कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

E20 जनता पार्टीवर संजय राऊत: कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janta Party) नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आणि थेट शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एन्ट्री झाली आहे. E20 जनता पार्टी (E20 Janta Party) असं या पार्टीचे नाव आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता. मात्र, आता इथेनॉल मिश्रित इंधन पुन्हा चर्चेत आलं. E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावं, सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, त्यांची सब्सिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा. ही त्यांची मागणी आहे.. या पक्षाच्या सोशल मीडीया अँकाऊंटचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत. सोशल मीडिया, मीम्स आणि व्यंग्याच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा या पक्षाला मिळताना दिसून येत आहे. (E20 Janta Party Marathi News)

E20 जनता पार्टीच्या नावाने सोशल मीडियावर स्वतंत्र हँडल तयार करण्यात आले असून, त्यावर E20 पेट्रोलविषयी सातत्याने पोस्ट केल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिक या अभियानाशी जोडले जात आहेत. भारत हा मध्यमवर्गीयांचा देश आहे. लाखो लोकांसाठी वाहन ही चैनीची वस्तू नसून रोजीरोटी आणि दैनंदिन जीवनाचा आधार आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च आणि इंजिनची कार्यक्षमता थेट त्यांच्या खिशावर परिणाम करते. वाहन उत्पादकांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे, त्याऐवजी सामान्य नागरिकांच्या वाहनांवर नवीन प्रयोग का केले जात आहेत, असा प्रश्नही या अभियानातून उपस्थित करण्यात आला आहे. E20 जनता पार्टीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. E-20 पार्टी येऊ शकते. निर्मला सितारामन यांच्यासाठी रुपया पार्टी येऊ शकते…रुपया घसरला म्हणून वन रुपीज पार्टी येऊ शकते…असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut On E20 Janta Party)

E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या कोणत्या? (E20 What are demands of the Janata Party?)

  • देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 सोबत 100 टक्के शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोल उपलब्ध करावे.
  • वाहन उत्पादकांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे, तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे.
  • सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कोणतेही इंधनविषयक प्रयोग सक्तीने लादू नयेत.
  • ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे.
  • आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत; त्यामुळे त्यांच्यावर प्रयोग करू नयेत.

E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली? (E20 Who founded the Janata Party?)

E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवर स्पष्ट करण्यात आले आहे की, हे एक स्वतंत्र नागरिक अभियान आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित प्रश्न मांडणे, पारदर्शकता सुनिश्चित करणे, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि भारताच्या E20 धोरणावर खुली व निष्पक्ष सार्वजनिक चर्चा घडवून आणणे, हाच या अभियानाचा उद्देश आहे. यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि आम्ही कोणत्याही राजकीय विचारसरणीचा प्रचार करत नाही. आम्ही फक्त नागरिकांच्या हक्कांच्या बाजूने उभे आहोत. या अभियानामागे कोण आहे किंवा ते कुठून चालवले जाते, याविषयीच्या अफवांपेक्षा मूळ प्रश्नांवर चर्चा होणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच, धोरणांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्राहकांच्या मतांना योग्य महत्त्व मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

संबंधित बातमी:

E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती

Comments are closed.