औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाख
MPSC FDA पेपर लीक महाराष्ट्र: गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचे अनेक पेपर फुटले आहेत. पैसे देऊन आणि आपल्या विचाराची लोक सिस्टीमध्ये जावी म्हणून काही लोकांनी महाराष्ट्रात नेटवर्क तयार केले आहे. एफडीएच्या (FDA) अंतर्गत येणाऱ्या औषध निरीक्षक भरतीचा पेपरही असाच फुटला होता. यामध्ये एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला (Paper Leak) असे म्हणता येणार नाही. पण पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती. या व्यक्तीने पैसे घेऊन दोन दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता, असा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. रोहित पवार यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर मांडणी केली. (Maharashtra Exam Paper leak)
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात टीईटी, नीट, एसआरपीएफ, एचएससी केमेस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल भरती, तलाठी भरती, महाजनको अशा विविध परीक्षांचे पेपर लीक झाले. या परीक्षांसाठी गरिबांची मुलं खूप परिश्रम घेतात. पण महाराष्ट्रात पैसे देऊन आणि आपल्या विचाराची लोक यंत्रणेत असावी या हेतूने पेपर लीक केले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
एफडीएच्या अंतर्गत येणाऱ्या औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटला होता, त्याबद्दल मी सांगतो. एफडीए खात्यात तुकाराम मुंढे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी असेल तर चांगले काम होते. पण ते वरच्या लेव्हलला आहेत. त्यांच्या खाली असणारे अधिकारीही चांगले असले पाहिजेत. पण
पण पैसे देऊन एखादी व्यक्ती औषध निरीक्षक अधिकारी झाली असेल तर तो नोकरीत आल्यावर आधी पैसे वसूल करण्याचं बघेल. ते काम योग्य पद्दतीने होणार नाही. या पदावर एखादी व्यक्ती पैसे देऊन गेली असेल तर काय अनर्थ होऊ शकतो, याचं उदाहरण आपण महाराष्ट्रात बघितले आहे. कफ सिरपमुळे गरिबांची 22 मुलं मेली. दुर्दैवाने महाराष्ट्रात हाच पेपर फुटला होता आहे. या पदावर गेलेली काही लोकं पैसे देऊन अधिकारी झाली आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले.
MPSC Paper Leak: औषध निरीक्षक भरतीचा पेपर कसा फुटला?
औषध निरीक्षक भरतीच्या परीक्षेसाठी 29 जुलैला 2025 जाहिरात आली. 22 मार्च 2026 रोजी परीक्षा झाली. 44500 विद्यार्थी या परीक्षेला बसले. निकालाची तारीख 12 जून होती. त्यानंतर 22 जुलैला तात्पुपरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये 506 उमेदवार पात्र झाले आणि त्यापैकी 150 जण फायनल झाले होते. नंदूरबारमध्ये कौटिल्य ॲकेडमी नावचा एक क्लास आहे. त्या क्लासमधून एका माणसाने पेपर लीक केला. एमपीएएससीचा पूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. या क्लासच्या विद्यार्थ्यांकडे 90 टक्के प्रश्न आधीच होते. दोन दिवस आधी क्सासमधील विद्यार्थ्यांकडे प्रश्न आले होते. विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यावर संबंधित व्यक्ती त्यांना व्हॉटसॲपवर गोष्टी पाठवायचा आणि दोन-तीन मिनिटांत डिलिट फॉर ऑल करायचा. एका विद्यार्थ्याने सगळे प्रश्न डाऊनलोड झाल्यावर पुरावे असावे म्हणून मित्राला पाठवले आणि पोलिसांना पुरावे सापडले, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी रोहित पवारांनी औषध निरीक्षक भरतीचा मूळ पेपर आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी पाठवण्यात आलेला पेपर स्क्रीनवर दाखवला. या सगळ्याबाबत आम्ही एमपीएससी कार्यालयात आम्ही जाणार आहोत. तसेच तुकाराम मुंढे यांनादेखील भेटणार आहोत, असे रोहित पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.