ISSF World Cup – हिंदुस्थानच्या महिला नेमबाजांची चमकदार कामगिरी; इशा सिंगने सुवर्ण, तर मनू भाकरने पटकावलं कांस्य पदक
हिंदुस्थानच्या महिला नेमबाज इशा सिंग आणि मनू भाकर यांनी चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या ISSF World Cup मध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात इशा सिंगने सूवर्ण पदक पटकावले, तर मनू भाकरने कांस्य पदकावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत इशा सिंगने 40 लक्ष्यांसह दणक्यात सुवर्ण पदक पटकावले तर मनूने 28 लक्ष्यांसह कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेच्या पात्रता फेरीतही हिंदुस्थानी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. मनू 586 गुणांसह अव्वल स्थानी राहिली, तर इशा सिंग 585 गुणांसह दुसऱ्या स्थानी होती. याशिवाय राही सरनोबत हिनेही 582 गुणांचे योगदान दिले, तर सिमरणप्रित कौर ब्रार आणि अभिज्ञा अशोक पाटील यांनी केवळ रँकिंग गुणांसाठी (RPO) सहभाग घेतला होता. म्युनिकमधील विक्रमी कामगिरीनंतर हांगझूमध्ये अपेक्षेचे ओझे होते, मात्र त्यावर मात केल्याचा आनंद असल्याचे इशाने सांगितले. तसेच, आशियाई क्रीडा स्पर्धेतील अनुभवाचा फायदा झाल्याचे तिने नमूद केले. आगामी स्पर्धांच्या तयारीसाठी हे पदक महत्त्वपूर्ण असल्याचे मनू भाकर हिने स्पष्ट केले. या दुहेरी पदकामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाजीत हिंदुस्थानचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
टीम इंडियासाठी दुहेरी आनंद! 🇮🇳🎯🥇🥉
ISSF विश्वचषक 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी भारताच्या प्रगतीचा पुरावा आहे… pic.twitter.com/6DySBIPkjQ
— देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) 27 जुलै 2026
Comments are closed.