बुमराह, शामी, सिराज…वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Play
वसीम जाफरने वनडे वर्ल्ड कप 2027 साठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनची निवड केली: दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाने ऑक्टोबर 2027 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 (ODI World Cup 2027) रंगणार आहे. या वनडे विश्वचषकासाठी देशांतर्गत क्रिकेटमधील माजी दिग्गज खेळाडू वसीम जाफरने (Wasim Jaffer) टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन निवडली आहे.
वसीम जाफरने 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी निवडलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये भक्कम वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामीसह मोहम्मद सिराजचाही समावेश आहे. तर रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर असा फलंदाजी क्रम असेल. त्यानंतर यष्टीरक्षक म्हणून वसीम जाफरने केएल राहुलला पसंती जिली असून अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटूमध्ये अक्षर पटेलसह कुलदीप यादवला प्लेईंन इलेव्हनमध्ये वसीम जाफरने स्थान दिले आहे. (Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027)
वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची तगडी Playing XI- (Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027)
- रोहित शर्मा
- शुभमन गिल
- विराट कोहली
- श्रेयस अय्यर
- केएल राहुल
- हार्दिक पंड्या
- अक्षर पटेल
- कुलदीप यादव
- जसप्रीत बुमराह
- मोहम्मद शमी
- मोहम्मद सिराज
विश्वचषकात एकूण 14 संघ सहभागी होणार- (ICC ODI WC 2027)
4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या विश्वचषकात एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. यजमानपद भूषवल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, दोन यजमान संघ आपोआप पात्र ठरतात, तर उर्वरित आठ संघांची निवड ‘वन-डे’ (ODI) मानांकनांच्या आधारे केली जाते. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे व्यतिरिक्त, ‘वन-डे’ मानांकनातील अव्वल आठ संघ यासाठी पात्र ठरतील. दरम्यान, अंतिम चार संघांना पात्रता फेरीतील स्पर्धेतून जावे लागेल.
आठ संघ आधीच पात्र ठरले- (ODI WC 2027 Team Qualification)
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ 2027 च्या ‘वन-डे’ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. जर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अफगाणिस्तान आणि बांगलादेश ‘वन-डे’ मानांकनात अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर राहिले, तर ते विश्वचषकातील आपले स्थान निश्चित करतील. अशा परिस्थितीत, दोनदा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडीज संघाला थेट पात्रता मिळणार नाही आणि त्यांना पात्रता फेरीतील स्पर्धेतून विश्वचषकात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अंतिम चार सहभागी संघांची निवड करण्यासाठी एकूण 36 संघांचा समावेश असलेली पात्रता फेरीची प्रक्रिया 2024 मध्येच सुरू झाली आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Comments are closed.