भाजपने मेलेल्या गायींच्या टाळूवरचं लोणी खाल्लं; 100 कोटींचा घोटाळा केला, हे तुमचं हिंदू राष्ट्र? – संजय राऊत
राजस्थानमध्ये मोठा गोशाळा उघडकीस आला आहे. मृत गायिंना जिवंत दाखवून कोट्यवधींचे अनुदान लाटणे आणि टॅग्जचा वापर करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. एका बाजुला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी झुंडबळी घेता आणि तुम्हीच मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खाता. हे तुमचे हिंदू राष्ट्र? असा सवाल संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
राजस्थानमध्ये गोशाळांना अनुदान मिळले. साधारण 100 गोशाळा बोगस निघाल्या असून भाजपच्या लोकांनी मेलेल्या गायींवरही अनुदान घेतले आहे. भाजपचे राज्य असलेल्या राजस्थानमध्ये हे चालले आहे. एका बाजुला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी झुंडबळी घेता आणि तुम्हीच मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खाता. मृत गायींवर घेतलेले 100 कोटींच्यावरील अनुदान हा गंभीर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिंदुत्ववादी किंवा सरसंघचालक मोहन भागवत काय करताहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
Comments are closed.