पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण
गोरी ब्युटी क्रीमवर एफडीएची कारवाई: पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीमचा (Goree Beauty Cream) राज्यात अनेक ठिकाणी धुमकुळ बघायला मिळत आहे. झटपट गोरे होण्याचा दावा करणाऱ्या या ब्युटी क्रीम मात्र अनेक महिलांसाठी जीवघेण्या ठरत आहे. पाकिस्तान निर्मित गोरी ब्युटी क्रीममुळे नागपूरमध्ये (नागपूर वार्ता) महिलांना किडनीचे विकार झाल्याचे डॉक्टरांच्या तपासात पुढे आले. असे असतानाच या गोरी ब्युटी क्रीमबद्दल एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. या क्रीममध्ये धोकादायक प्रमाणात पारा आणि शिसे आढळल्याची माहिती पुढे आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) नुक्त्याच्या आलेल्या अहवालातून या संदर्भात पुष्टी करण्यात आली आहे.
Fairness Cream Alert : क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण;
अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूरमध्ये जप्त केलेल्या गोरी ब्युटी क्रीमचे मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले होते. या तपासणीनंतर आलेल्या अहवालात गोरी ब्युटी क्रीम मध्ये 11 हजार 991 पीपीएम पाराचे प्रमाण आढळले. तर शिसेचे प्रमाण 3.2 पीपीएम आढळले आहे. हे प्रमाण मर्यादेपेक्षा चार पट अधिक असल्याचे अन्न औषध व प्रशासन विभागाचे म्हणणे आहे. परिणामी गोरी ब्युटी क्रीमच्या विक्रीवर आता प्रतिबंध लावले आहे. या क्रीमची निर्मिती पाकिस्थान मध्ये होते. अवैध पद्धतीने भारतात त्याची विक्री केली जाते. या क्रीमच्या वापराणे अनेक महिलांना किडनीचे विकार झाल्याचेही पुढे आले होते. अशातच या प्रकरणी अहवालातून पुढे आलेली माहिती आणि त्याचा वापर करणे धोकादायजक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Goree Beauty Cream: महिलांना किडनीचे विकार, क्रीमचा वापर करणे धोकादायजक असल्याचे निष्पन्न
पाकिस्तान निर्मित गोरी ब्युटी क्रीममुळे नागपूरमध्ये महिलांना किडनीचे विकार झाल्याचे डॉक्टरांच्या तपासात पुढे आले. अवैध पद्धतीने विक्री होणाऱ्या गोरी ब्युटी क्रीममध्ये पारा (मर्क्युरीची अतिरिक्त मात्र असते. चेहऱ्यावर क्रीम लावल्यानंतर यातला मर्क्युरी त्वचेतून शरीराच्या आत जातो व पूढे रक्तात मिसळातो. यामुळे त्याचा थेट परिणाम महिलांच्या किडनीवर होतो. नागपूरमध्ये मागच्या दोन वर्षात एकाच ओपीडीमध्ये 18 महिलांना या ब्युटी क्रीममुळे किडनीचे विकार झाल्याचे पुढे आले आहे. महत्वाचं म्हणजे नागपूर शहरात याची खुलेआम विक्री सुरू आहे. त्यानंतर माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने शोध मोहित घेत मार्केटमधून मोठा साठा जप्त केला आहे.
Health Risk : आरोग्यावर गंभीर परिणाम
या क्रीम्सचा वापर करणाऱ्या काही तरुण-तरुणींनी आरोग्य बिघडल्याचा दावा केला आहे. गोरं होण्याच्या नादात वापरलेल्या या क्रीम्समुळे त्वचेवरच नाही तर थेट किडनीवरही परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.
Public Concern : नागरिकांसमोर मोठा प्रश्न
गोरं होण्याच्या हव्यासापोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याशी खेळ करतायत का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अशा क्रीम्स वापरून कायमस्वरूपी गोरे होता येत नाही, उलट त्वचा आणि किडनी दोन्ही धोक्यात येतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Comments are closed.