रामरक्षा कशी म्हणायची ते आम्ही बघू, राम मंदिराच्या दानपेट्या चोरीला गेल्या हे तुम्हाला मान्य आहे का? संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या लुटीविरोधात हिंदू जागृतीसाठी शिवसेनेने राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाचा दुसरा टप्पा उपराजधानी नागपुरातून 18 जुलैपासून सुरू होणार आहे. नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामरक्षा आंदोलनाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला. रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू, राम मंदिराच्या दानपेट्या चोरीला गेल्या हे तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

दोन पानं रामरक्षा वाचून दाखवण्याचे आव्हान देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रश्न रामरक्षा येते की नाही हा नसून श्रीराम मंदिराची दानपेटी चोरीला गेली आहे यावर उत्तर द्या. रामरक्षा कशी म्हणायची ते आम्ही बघू. तुम्ही आम्हाला नका सांगू. राम मंदिरात चोरी झाली आहे. 550 कोटींच्या दानपेट्या चोरीला गेल्या आहेत. गेल्या 12 वर्षांत जवळपास 13 हजार कोटींची लूट झाली असून हे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला रामरक्षा येते की नाही हे काय सांगताय. आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही तुम्हाला दाखवू. राम मंदिराच्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्यावर बोला, असा टोलाही संजय राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.

“शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले अन्…”, संजय राऊत यांनी घेतला खरपूस समाचार

Comments are closed.