आता पंतप्रधानांच्या आदेशाविरोधात कुणी जायला सांगितलं तर मोदी काय करतील? आणीबाणीच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी मांडली भूमिका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्र अभ्यासक्रमामध्ये, १९७५-७७ च्या राष्ट्रीय आणीबाणीचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. ”आणीबाणीच्यावेळी भाजपचे मोठे नेते लष्काराला, पोलिसांना पंतप्रधानांविरोधात भडकवत होते. त्यांना इंदिरा गांधीविरोधात बंड करायला सांगत होते. आता पंतप्रधानांच्या आदेशाविरोधात कुणी जायला सांगितलं तर मोदी काय करतील? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

”आणीबाणी विषयी अभ्यासक्रमात टाकण्यात येणार असेल ठीक आहे, सगळ्यांना समजायलाच हवं की जे अशाप्रकारे वागतात त्यांची सत्ता जाते. 12 वर्षांपासून देशात आणीबाणी आहे. इंदिरा गांधींनी कोणता पक्ष नाही फोडला, त्यांनी संविधान संपवले नाही. जेव्हा संघाचे लोकं तुरुंगात होते तिथे इंदिराजींनी त्यांची फाईव्ह स्टार व्यवस्था केली होती. स्पेशल हॉटेलचे कूक इंदिरा गांधींनी तुरुंगात त्यांच्यासाठी ठेवले होते. 50 वर्ष झाली त्या गोष्टीला. इमरजन्सी हा काही अभ्यासाचा विषय आहे का? ती एक व्यवस्था आहे. देशात अराजकता पसरते तेव्हा आणीबाणी लावली जाते. या देशाच्या संविधानाने पंतप्रधानांना ते अधिकार दिले आहेत. पण तुम्ही संविधानालाच मानत नाही. मग तुम्ही नोटबंदी का आणली? कोरोना काळात तुम्ही साथरोग का जाहीर केलं? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं. त्यावेळी भाजप नेते पोलिसांना फौजांना सांगत होते की पंतप्रधानांचा आदेश मानू नका. चरणसिंग, जयप्रकाश नारायण यांची ही भाषा होती. फौजांना बंड करायला सांगत होते. इंदिरा गांधींविरोधात जा असं सांगत होते. जर आता मोदींच्या आदेशाविरोधात कुणी जायला सांगितलं तर मोदी काय करतील? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Comments are closed.