निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक, संजय शिरसाटांचा थेट आरोप; म्हणाले, ‘मी मुख्यमंत्र्यांना.
नाशिक टीसीएस प्रकरणी संजय शिरसाट निदा खान: नाशिक येथील बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली असून, तिच्या अटकेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
नाशिक टीसीएस प्रकरणावर संजय शिरसाट निदा खान: 'निदा खान ही पगारी कामगार आहे'
संजय शिरसाट म्हणाले की, “नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान ही पेड वर्कर होती. एमआयएमच्या नगरसेवकाने तिला आसरा दिला. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता जे घर तिला दिलं, तेही अनधिकृत आहे. त्यावरही आज उद्यामध्ये कारवाई होईल. मात्र मास्टरमाइंड इम्तियाज जलील आहे,” असा दावा त्यांनी केलाय.
इम्तियाज जलीलवर संजय शिरसाट: निदा खान इम्तियाज जलील यांची नटवाईक
शिरसाट यांनी निदा खान आणि इम्तियाज जलील यांच्यातील नातेसंबंधावर थेट बोट ठेवले आहे. “निदा खान ही इम्तियाज जलीलचा भावाच्या पत्नीची नातेवाईक आहे. त्यामुळेच जलील यांचा थेट संबंध आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. तर, मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याची माहिती देखील त्यांनी दिलीय. आता या आरोपावर इम्तियाज जलील काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nida Khan: एसआयटी तपास आणि अटकेची कारवाई
दरम्यान, नाशिकमधील टीसीएस कंपनीत लैंगिक शोषण, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा छडा लावत आहे. निदा खान 26 मार्चपासून फरार होती. तिला नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नरेगाव परिसरातील कैसर कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. निदा खानच्या चौकशीतून आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, पीडितेचे नाव बदलण्यापासून तिला 171 धार्मिक लिंक्स पाठवण्यापर्यंतचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
Nida Khan: निदा खानला आज न्यायालयात हजर करणार
निदा खान हिला आज नाशिक रोड न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे. पोलीस कोठडीदरम्यान निदा खानची स्वतंत्रपणे तसेच कुटुंबीयांसमवेत चौकशी करण्यात आली. तपासातून नेमकी कोणती माहिती समोर आली आणि अद्याप कोणत्या बाबींचा उलगडा व्हायचा आहे, याचा आढावा सरकारी पक्षाकडून न्यायालयात मांडला जाणार आहे. दरम्यान, निदा खानची पोलीस कोठडी वाढवून मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.