TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही, काश्मीर फाईल्सप्रमाणेच हे घडतंय; संजय शिरसाटांचा खळबळज
नाशिक टीसीएस प्रकरणी संजय शिरसाट निदा खान: नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, सत्ताधारी पक्ष आणि एमआयएम यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. हे प्रकरण केवळ निदा खानपुरते (Nida Khan) मर्यादित नसून, यामध्ये धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्ज तस्करीसारखे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना वाचवण्यासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) धडपड करत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट पत्रकार परिषदेत म्हणाले की, निदा खान प्रकरणात ज्या नवीन-नवीन घटना घडत आहे आणि माहिती समोर येत आहे ती अत्यंत भयानक आहे. निदा खानला कोणी पाठवले? हे महत्वाचे आहे. ती मुंब्राला कशी आली आणि पुन्हा संभाजीनगरला कशी आली? तिचा संभाजीनगरशी काही संबंध नाही. ती येथे महिना, दीड महिना राहते. एक म्हातारा घराबाहेर यायचा. बाकी कोणी बाहेर पडायचे नाही. ज्या नगरसेवकाचं ते घर आहे तो एमआयएमचा आहे. ते घर द्यायला इम्तियाज जलील यांनी मजबूर केले. जलील यांची कालच्या पत्रकार परिषदेत देहबोली पाहा. कोणतीही केस बघा. पहिले आरोपीला पकडले जाते आणि नंतर चौकशी वगैरे केली जाते. त्या कामात सुद्धा अडथळा आणला. आरोपीला फरार करणे आणि पुन्हा छातीठोकपणे सांगणे. चार्जशीट आहे का विचारणे हे जाणून बुजून केले जात आहे. हे प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही. राज्यात अनेक ठिकाणी निदा खान प्रकरण आहेत. काश्मीर फाईल्सप्रमाणे हे घडत आहे. याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे, असा आरोप त्यांनी केला.
Sanjay Shirsat: एकाला वाचवण्यासाठी दुसऱ्याची धडपड
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, काल त्या नगरसेवकाला अटक केल्यानंतर पोलीस जेव्हा इम्तियाजकडे गेले, तरी त्याची मस्ती कमी होती नाही. याला मी राजकारणाशी जोडत नाही. पण याला वाचवण्यासाठी असदुद्दीन ओवैसी येत आहे. एकाला वाचवण्यासाठी दुसरा धडपडत आहे. नगरसेवक आरोपी आहेच पण या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, याबाबत मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. याला राजकीय रंग देऊ नका. लव्ह जिहाद, धर्मांतर करणे आणि नशाखोरी करणे असे तीन टप्प्यात काम सुरू आहे. या तपासातून रॅकेट बाहेर येणार आहे. नाशिकच्या पोलिसांचे मी काल अभिनंदन केले आणि आजही करतो. कोणाला घाबरण्याचे कारण नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.