निलम गोऱ्हेंना निर्लज्ज म्हणता.. लाज वाटते का? संजय शिरसाटांनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले

संजय सोर्सॅट: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निलम गोऱ्हेंवर ‘ निर्लज्ज, नमकहराम..’ अशी टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट शिवसेना ठाकरे गटासह संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. एका बाईला निर्लज्ज म्हणता. लाज वाटते का. ज्या महिलांना छळलं त्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. हा महिलांचा अपमान आहे. आता ज्या गाड्या आहेत त्या कोणाच्या नावावर आहेत नेमक्या? असा सवाल करत आम्हाला बोलायला लावू नका . आम्ही बोललो तर महाराष्ट्रात इज्जत जाईल असे म्हणत शिरसाटांनी राऊतांवर जोरदार टीका केली. (Sanjay Shirsat On Sanjay Raut)

काय म्हणाले संजय शिरसाट?

‘आम्हाला बोलायला लावू नका. आणखी खोलात गेलो तर तुमची मुश्कील होईल. कार्पोरेशनचे व्यवहार कसे होतात.. कोणत्या हॉटेलमध्ये होतात. कोण कोण असतं यात हे सगळ्यांना माहित आहे. पण सगळे शांत आहेत कारण त्यांना आणखी डिवचायचं नाहीय.आरोप करायला काही लागत नाही. जे सत्य आहे ते मान्य करावं लागेल. आज जे चाललं आहे त्यामुळे तुमचा पक्ष रसातळाला गेलाय.काल आलेल्या माणसाला महत्वाचं पद मिळतं पण वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काही देऊ शकत नाही हे तुम्ही जाहीरपणे सांगितलंय. देऊ शकलो नाही कारण तुम्ही फाटके आहात. आम्ही कोणाचा एक रुपया खाल्ला नाही सांगाल का शपथेवर? असा सवालही शिरसाटांनी केला.

‘संजय राऊत जो बडबड करतोय त्याच्यावर ED ची रेड पडली होती. 10 लाख रुपये घरात मिळाले होते. रामाच्या मंदिराला दिलेले पैसे तुम्हाला पुरले नाही. आता बडबड करताहेत. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तुम्ही बुडवली. निलम गोऱ्हेना निर्लज्ज अशी टीका करत.. लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतोस. आमच्या पक्षांच्या कोणाकडून असं झालं असतं तर काय केलं असतं..बाईचा अपमान झाला…आता तू काय करतोस.. ज्या महिलांना तुम्ही छळलंत त्यांनी अनेकवेळा सांगितलंय, तुम्ही कसं छळलंय ते. आता जास्त बोलायला लावू नका. महिलांना निर्लज्ज शब्द महिलांसाठी वापरू नका. एका बाईला निर्लज्ज बोलतात लाज वाटते का?  अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. ज्या गाड्या आहेत त्या कोणाच्या नावावर आहेत नेमक्या? असा सवालही त्यांनी केला.आम्हाला बोलायला लावू नका… आम्ही बोलो तर महाराष्ट्र मध्ये इज्जत जाईल.शरद पवार यांच्या चपलेची ज्याला सर नाही त्यांच्या विरोधात हे बोलतात.एका रात्री कॅबिनेट मंत्रिपद दिलं…कुठे गेले ते सगळे खोके… स्वप्नात आलं होतं का कॅबिनेट मंत्रिपद..पैसे कसे घेतले जायचे हे केसरकर नारायण राणे यांना विचारा.ऐन वेळेला पत्ता कट केला जातो.धंदा म्हणून राजकारण बघत आहेत.’ अशी टीका संजय शिरसाटांनी केली.

https://www.youtube.com/watch?v=ie_ojs7jr1o

हेही वाचा:

Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप

अधिक पाहा..

Comments are closed.