संभाजीनगरचा पालकमंत्री मीच, संजय शिरसाट म्हणाले, जो कुणी धाक नाही असा समजत असेल तर..

संजय शिरसाट :मला मंत्रिपद मिळाले याचा आंनद आहे. शिंदे साहेब यांनी नवीन जबाबदारी दिली आहे.संभाजीनगर पालकमंत्री मीच होणार आहे.अनेक घटना ज्या संभाजीनगरमध्ये घडल्या आहेत, जी काही गुंडगिरी वाढली आहे, त्यावर आळा घालणार आहे.कोणत्याही पक्षाचा असला तरीही कारवाई होईल. जो कुणी धाक नाही असा समजत असेल तर त्यांना धडा शिकवला जाईल, असं संजय शिरसाट म्हणाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता नसल्याचं सांगताना ते म्हणाले, लग्नात भेटले तर वातावरण तापण्याची गरज नाही, राज ठाकरे यांनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी हात मागे घेतला. त्यामुळे दोघीही आता एकत्र येण्याची शक्यता नाही.’ उद्यापासून दौरे सुरू होणार आहे, मी आणि उदय सामंत उद्या मस्साजोग आणि परभणी येथे जाणार आहे.सर्व समाजात सलोखा राखण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. दरम्यान पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले..

मला मंत्रिपद मिळाले याचा आंनद आहे. शिंदे साहेब यांनी नवीन जबाबदारी दिली आहे.संभाजीनगर पालकमंत्री मीच होणार आहे.अनेक घटना ज्या संभाजीनगरमध्ये घडल्या आहेत, जी काही गुंडगिरी वाढली आहे, त्यावर आळा घालणार आहे.कोणत्याही पक्षाचा असला तरीही कारवाई होईल.जो कुणी धाक नाही असा समजत असेल तर त्यांना धडा शिकवला जाईल. असं संजय शिरसाट म्हणाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता नसल्याचं सांगताना ते म्हणाले,लग्नात भेटले तर वातावरण तापण्याची गरज नाही, राज ठाकरे यांनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी हात मागे घेतला. त्यामुळे दोघीही आता एकत्र येण्याची शक्यता नाही.जीवन प्राधिकरण वादावर दोन्ही अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडवण्यात येईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. तसेच DPDC निधीचे फेरनिवेदन करण्यात येईल आणि चुकीच्या कामांसाठी निधी खर्च होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-

मराठी: एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरलं; अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या, पण खर्चाचे अधिकार…

अधिक पाहा..

Comments are closed.