ट्रेंड – लाल कलरची बांगडी गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोशल मीडियावर सध्या लाल, लाल कलरची बांगडी हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक तरुणी या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करून नेटकऱयांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशातच एका चिमुकलीने या गाण्यावर केलेल्या भन्नाट डान्सने नेटकऱयांना भुरळ पडली आहे. हातात लाल बांगडय़ा, नाकात नथ आणि लाल पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून या चिमुकलीने असा अप्रतिम डान्स केला की नेटकरी तिच्या प्रेमातच पडले. @adorable_aanyaa या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या चिमुकलीने केलेला डान्स, तिच्या चेहऱयावरील हावभाव पाहून नेटकऱयांनी तिच्यावर काwतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला दोन लाखांपर्यंत लाईक्स मिळाल्या आहेत.

Comments are closed.