पहिला चान्स मिळाला तर उडवून टाकू…; वैभव सूर्यवंशीच्या IPL डेब्यूवेळी ड्रेसिंग रूममध्ये काय घड
वैभव सूर्यवंशी आयपीएल पदार्पणावर संजू सॅमसन : भारतीय क्रिकेटमध्ये उदयोन्मुख खेळाडूंची कमतरता नाही. मात्र काही खेळाडू आपल्या निर्भीड विचारांमुळे आणि आत्मविश्वासामुळे कारकिर्दीच्या सुरुवातीलाच चर्चेत येतात. असंच एक नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने त्याच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा सांगितला.
नवी दिल्लीमध्ये झालेल्या बीसीसीआय नमन पुरस्कार2026 (BCCI Naman Awards 2026) कार्यक्रमादरम्यान सॅमसनने एक किस्सा सांगितला. या कार्यक्रमात अंडर-19 वर्ल्ड कप विजेते भारतीय संघ तसेच आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूही उपस्थित होते. मंचावर हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी आले होते.
वैभव सूर्यवंशीच्या IPL डेब्यूवेळी ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?
सॅमसन म्हणाला की, “राहुल सरांनी वैभवला बोलावलं आणि विचारलं, तुझा गेम प्लॅन काय आहे? त्यावर वैभव म्हणाला, ‘काही खास नाही सर… आता फक्त खेळणार.’ मग राहुल सर पुन्हा म्हणाले, ‘अरे, गेम प्लॅन काय आहे ते सांग.’ तेव्हा वैभव म्हणाला, ‘पहिल्याच चेंडूवर पहिला चान्स मिळाला तर उडवून टाकू…’ आणि मैदानात त्याने अगदी तसंच केलं. आम्हाला वाटलं हा तर वेगळंच व्हिडिओ गेम खेळतोय.” सॅमसनने सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
“अगर हमे पहला मिला, पहले ही उडा देंगे!” 😄
सॅमसनने वैभव सूर्यवंशीची त्याच्या निर्भय गेमप्लेमागील साधी पण अतिशय प्रभावी रणनीती उघड केली! 🙌💪
बीसीसीआय नमन पुरस्कार पहा 👉https://t.co/8W5zMWhfvk pic.twitter.com/0f04IeP6S2
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) १५ मार्च २०२६
वैभवची आवडती फिल्म अन् मोठं स्वप्न
या कार्यक्रमात वैभव सूर्यवंशीने स्वतःबद्दल काही रंजक गोष्टीही सांगितल्या. त्याने सांगितले की 2017 मध्ये त्याने स्टेडियममध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पाहिला होता. तसेच त्याची आवडती फिल्म “धुरंधर” असल्याचेही त्याने सांगितले. याशिवाय त्याने मोठं स्वप्नही व्यक्त केलं. टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल याने केलेल्या 175 धावांच्या विक्रमाला मोडण्याची इच्छा असल्याचे वैभवने स्पष्ट केले.
अवघ्या 14व्या वर्षी IPL पदार्पण
वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये इतिहास रचला. तो केवळ 14 वर्षे 23 दिवसांचा असताना राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. मेगा लिलावात राजस्थानने त्याला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
पदार्पणाच्या वेळीच त्याने आपली धमक दाखवली. क्रीजवर येताच शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर कव्हरच्या वरून जबरदस्त षटकार मारत त्याने खाते उघडले. यानंतर आयपीएल 2025 मध्ये त्याने आणखी एक मोठा विक्रम केला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ 38 चेंडूत 101 धावांची तुफानी खेळी करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.