पायात महागडी चप्पल, शर्टचं पहिलं बटण उघडं अन् चेहऱ्यावर बेदरकार भाव; सरपंच संतोष देशमुखांचा मार
बीड : राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेल्या संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला काल (शुक्रवारी, ता १३) कडक पोलिस बंदोबस्तात जिल्हा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं. जयराम चाटेच्या भावाचा मृत्यू झाल्याने त्याच्या धार्मिक विधीसाठी केज तालुक्यातील तांबवा या मूळ गावी उपस्थित राहण्याकरिता त्याने न्यायालयात अर्ज केला होता, ज्यावर अटी व शर्थीसह न्यायालयाने त्याला काही तासांची परवानगी मंजूर केली. जयराम चाटे याच्या भावाचे २ मार्च रोजी निधन झाले. या घटनेनंतर आपल्या मूळ गावी म्हणजेच तांबवा येथे धार्मिक विधीमध्ये सहभागी होता यावे, यासाठी जयराम चाटे याला काल (शुक्रवारी ता १३) सकाळी जिल्हा कारागृहातून बाहेर काढले होते.(Santosh Deshmukh Case)
जयराम चाटे याने आपल्या वकिलामार्फत न्यायालयाकडे विनंती केली होती. न्यायालयाने त्याला शुक्रवारी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंतची वेळ ठरवून दिली होती. या सात तासांच्या कालावधीत त्याला विधी पूर्ण करून पुन्हा कारागृहात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. सात तासांच्या या सवलतीनंतर विधी आटोपून त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले.(Santosh Deshmukh Case)
मोठ्या बंदोबस्तात नेलेल्या जयरामचा अवतार चर्चेत
जयराम चाटेला कारागृहातून बाहेर काढून तांबवा गावी नेताना पोलिसांनी सुरक्षेची अत्यंत चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलिसांची मोठी तुकडी आणि बंदूकधारी कर्मचारी त्याच्यासोबत तैनात करण्यात आले होते. कारागृहाबाहेर येताना जयराम चाटेच्या रुपात मोठे बदल दिसून आले. त्याने पूर्णपणे ‘क्लीन शेव्ह’ केलेली होती, कपाळावर मोठा लाल गंध लावलेला होता आणि अंगात काळा रेघाळ शर्ट होता, राखाडी रंगाची जिन्स आणि पायात महागडी चप्पल, असा त्याचा अवतार होता. शर्टची पहिली गुंडीही त्याने काढलेली दिसली.(Santosh Deshmukh Case)
गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी पण चेहऱ्यावर लवलेशही नव्हता
एका गंभीर हत्या प्रकरणातील आरोपी असूनही, जयरामच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव किंवा भीती दिसून आली नाही. हातरुमाल घेऊन अत्यंत शांतपणे तो पोलिसांच्या ताफ्यात तांबवा गावाकडे रवाना झाला.
जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर
जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडला आहे. जयराम चाटेच्या भावाचे दोन मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतर केल्या जाणाऱ्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात (Santosh Deshmukh Case) अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12 व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत हा वेळ दिला गेला आहे. बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला असून त्याच्या मूळ तांबवा या गावी चाटेच्या भावाचा 12 व्याचा विधी होत आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली.(Santosh Deshmukh Case)
आणखी वाचा
Comments are closed.