संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन फर्मान सोडलं, ऑडिओ क्लीप व्हायरल
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील धक्कादायक तपशील समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपपत्रात संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांना हाल हाल करुन मारतानाचे व्हिडीओ, फोटो आणि फोनवरील संभाषणांचा समावेश आहे. यापैकी एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. संतोष देशमुख यांना ठार मारण्यापूर्वी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यामध्ये फोनवरुन बोलणे झाले होते. यावेळी वाल्मिक कराड याने पवनचक्की प्रकल्पाचे काम बंद करण्याचे फर्मान सोडले होते. हे काम आहे त्या परिस्थितीत बंद करा, असा दम वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे (Sunil Shinde) यांना दिला होता. 23 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. निवडणुका संपल्याने मी आता मोकळा झालोय, असे वाल्मिकने या संभाषणात म्हटले आहे. या संभाषणाचा तपशील पोलिसांच्या हाती लागला होता. हा तपशील पोलिसांनी आरोपपत्रात जोडला आहे. (Beed Crime news)
त्या ऑडिओ क्लीपमध्ये नेमकं काय संभाषण?
सुनिल शिंदे- नमस्कार विष्णू भाऊ
विष्णु चाटे- हॅलो शिंदे साहेब
सुनील शिंडे- बोला ना
विष्णु चाटे- आण्णा बोलणारेत
सुनील शिंदे- हं द्या ना
वाल्मिक कराड- हॉलो
सुनील शिंदे- नमस्कार आण्णा
वाल्मीक कराड- अरे ते बंद ठेवा, चालू केलं तर वातावरण गढूळ होईल
सुनील शिंदे- बरं बरं आण्णा
वाल्मीक कराड- ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, त्या परिस्थितीत आहे, त्या परिस्थितीत बंद करा
सुनील शिंदे- मी मेसेज देतो बरका
वाल्मीक कराड- मेसेज द्या , नाहीतर मा#$ भो$# जा
सुनील शिंदे- बरं आण्णा, बरं आण्णा
वाल्मिक कराड- ते बंद करा म्हणजे बंद करा
सुनील शिंदे- आण्णा बरं
व्हॅलमिक- एक राखाडी निवडणुका आहेत, मी म्हणालो, आता सर्व मिनिटे थांबवा आणि आपण परंतु आपण परंतु आपण परंतु आपण परंतु आपण परंतु घसा, निघून जा.
सुनील शिंदे- हो आण्णा, हो आण्णा
वाल्मीक कराड- बंद करा, सगळं बाकीचं बंद करा
सुनील शिंदे- आण्णा हो
वाल्मीक कराड- तुमचं नाटक बंद झालं, तुम्ही कोल#$ का आम्हाला, बंद करा दोन मिनिटांत
सुनील शिंदे- आण्णा आण्णआ
वाल्मीक कराड- सांग रे सुदर्शनला, फक्त मारामारी करु नको म्हणावं, शिंदे
सुनील शिंदे- आण्णा
वाल्मीक कराड- काम चालू झालं तर याद राखा
सुनील शिंदे- आण्णा हो
वाल्मीक कराड- काम चालू झाले तर याद राखा
सुनील शिंदे- हो आण्णा, हो आण्णा
https://www.youtube.com/watch?v=pwomriyqzge
आणखी वाचा
अजून कोणता पुरावा हवाय? संतोष देशमुखांना झालेल्या क्रूर मारहाणीचे फोटो एबीपी माझाच्या हाती!
अधिक पाहा..
Comments are closed.