सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर; संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्वाची माहिती समोर

संतोष देशमुख हत्येचा खटला बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी काल (7 फेब्रुवारी) सीआयडी अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली. यादरम्यान धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी चौकशीसंदर्भात चर्चा केली. तसेच तपासामध्ये अडसर ठरणाऱ्या गोष्टींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच विष्णू चाटेच्या (Vishnu Chate) मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीने शोधला आहे. त्यामध्ये महत्त्वाची माहिती मिळाली आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही. मात्र तपास समाधानकारक सुरू आहे, असं मतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी केली.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुख काय म्हणाले?

संतोष देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडसर ठरत असतील त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घ्यावी, ही विनंती अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर दिलेली आहे. धनंजय देशमुख यांनी केज येथील शासकीय विश्रामगृहावर सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली. तपासाच्या अनुषंगाने चर्चा झाली, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.

लवकरच उज्वल निकम यांची नियुक्ती होणार-

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांनी भाजपा आमदार सुरेश धस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आतापर्यंत झालेल्या तपासासंदर्भात चर्चा करण्यात आली. आम्ही दोघांनी चर्चा केली असून या प्रकरणात कोणताही कसूर राहू नये. यात कोणीही सुटता कामा नये अशी चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख याला सर्व ओळखायचे माझ्या पक्षातील तो बूथ प्रमुख होता. त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केली. त्यात कोणताही कसूर राहू नये. यावर चर्चा केली आहे. तर उद्या किंवा परवा उज्वल निकम यांची ऑर्डर निघेल, अशी माहिती भाजपचे आमदार सुरेध धस यांनी दिली. तसेच अशोक मोहिते गंभीर आहे. त्याच्यावर ज्यांनी वार केले त्याला सुट्टी देणार नाही. अशोकला संतोष देशमुखांचे व्हिडीओ का पाहतो यामुळेच मारले. एवढी मस्ती आणि माज आकाच्या लोकांचा गेला नसल्याचं, सुरेश धस यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=cilergpsqiy

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray : सहा खासदार सोडून जाणार असल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..

Comments are closed.