ज्याच्यावर संतोष देशमुखांची टीप दिल्याचा आरोप, त्याच्या सुटकेचा आदेश, 25 हजारांच्या जातमुचलक्य
संतोष देशमुख हत्येचा खून: बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या हत्येतील दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. एकीकडे देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली जात असतानाच, आता या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणे या आरोपीची सुटका करण्याचा आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.
सीआयडीने दाखल केले दोषारोपपत्र
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आपला तपास पूर्ण करून केजच्या न्यायालयात 1400 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सीआयडीने प्राप्त पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे म्हटले आहे. असे असतानाच आता न्यायालयानेही याच हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणे याची सुटका करण्याचा आदेश दिला दिला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ही सुटका करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे?
केज जिल्हा व सत्र न्यायालयाचे एक आदेश दिला आहे. या आदेशात संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेला सोडण्यात यावे असे म्हटले आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणापूर्वी सिद्धार्थ सोनवणे यांनीच टीप दिली होता, अशा आरोपाखाली सीआयडीने 70 दिवसांपूर्वी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र आता केजच्या न्यायालयाने सोनवणे यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात यावे, असा आदेश दिला आहे. सध्या सिद्धार्थ सोनवणे हे बीड जिल्हा कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्यांची सुटका होणार आहे.
सीआयडीच्या दोषारोपपत्रात नेमकं काय आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड आहे, असेही या दोषारोपपत्रात सांगण्यात आलंय. हा दावा करताना एका व्हिडीओ क्लिपचा आधार घेण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=4pa-7oqicq
हेही वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.