कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख

संतोष देशमुख हत्येचा खून: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा गेल्या 98 दिवसांपासून फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. याबाबत बोलताना धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh)  म्हणाले की, कृष्णा आंधळे सापडणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असल्याचे देशमुख म्हणाले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 98 दिवस पूर्ण झालेत. मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावे. तसेच यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे धनंजय देशमुख म्हणाले. कृष्णा आंधळेकडे जास्त पुरावे असतील. त्यामुळं तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करत आहे. तर नक्कीच त्याच्याकडे ठोस पुरावे असतील आणि त्याची चौकशी गरजेची आहे असे धनंजय देशमुख म्हणाले.

नेमका कोण आहे कृष्णा आंधळे ?

कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे. तो छत्रपती संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीमध्ये आला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केले आहेत. त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. पत्र्याचं घर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तो आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून संतोष आंधळे हा फरार आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. पोलिसांकडून कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात आहे. त्याच्या फरार असण्यामागे अनेकदा वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. तर काहींनी कृष्णा आंधळे जिंवत आहे की नाही याबाबत देखील शंका व्यक्त केली होती. त्यानंतर आता आणखी एका दाव्याने कृष्णा आंधळेबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण 3 महिने झाले तरी अद्याप कृष्णा आंधळेचा शोध लागलेना नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध

अधिक पाहा..

Comments are closed.