संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुट
संतोष देशमुख हत्येचा खटला बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करून पळणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हत्येनंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून 6 आरोपी पळाल्याचे या सीसीटीव्हीद्वारे दिसत आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 2 महिने झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. मात्र हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) अजूनही फरार आहे. संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. याचदरम्यान सदर प्रकणातीला आरोपींचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
आरोपींचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर-
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणाहून पळून जातानाचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. धाराशिवमधील वाशी शहरातील पारा चौक या ठिकाणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे साथीदार पोहोचले आणि त्या ठिकाणाहून स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळून जाताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्याच दिवशीचं म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्यानंतरच हे फुटेज आहे.
बीड जिल्ह्यातील 310 शस्त्र प्रमाणे रद्द-
बीड जिल्ह्यामध्ये परवानाधारक शस्त्र परवान्यांपैकी आतापर्यंत 310 जणांचे शस्त्र परवाने हे रद्द करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1281 इतके शस्त्र प्रमाणे आहेत मात्र ज्या व्यक्ती वरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्या व्यक्तीकडील पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता आणि त्याची कारवाई मागच्या एक महिन्यापासून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण परवानाधारक पिस्तूल चा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या 25% परवाने हे रद्द झाले आहेत.
आपण तपास यंत्रणेवर अप्रत्यक्ष प्रश्न चिन्ह निर्माण करतोय- ज्योती मेटे
शिवसंग्रामच्या अध्यक्षा जोती मेटे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे अमानवी कृत्य असून, सर्व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जेव्हा राजीनाम्याचा प्रश्न उपस्थित केला जातो, तेव्हा माझं या बद्दल वेगळं मत आहे, ज्या तपास यंत्रणा आहेत, त्या तपास यंत्रणांनी निःपक्षपाती पणेच काम करणे अपेक्षित आहे. असं वक्तव्य शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी केलं. आपण जेव्हा असं म्हणतो की, एखाद्याने राजीनामा द्यावा जेणेकरून या यंत्रणा चांगल काम करू शकतील. त्यामुळे आपण तपास यंत्रणेवर अप्रत्यक्ष प्रश्न चिन्ह निर्माण करतोय, असं ज्योती मेटे म्हणाल्या. तसेच राजीनामा हा पक्षाच्या नेतृत्वाचा आणि मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, असंही ज्योती मेटे यांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=Meddiqdc-xo
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.