संतोष देशमुख हत्या प्रकरण! सरकारी पक्षाकडून व्हिडिओचे पुरावे सादर, पुढील सुनावणी 23 डिसेंबरला
संतोष देशमुख खून प्रकरण : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh murder case) महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 डिसेंबर रोजी होणार आहे. सरकारी पक्षाकडून आरोपीच्या वकिलांना व्हिडिओचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. मात्र हे व्हिडिओ पुरावे व्हायरल होऊ नये असे न्यायालयाने आरोपीच्या वकिलांकडून लिहून घेतले आहे. संतोष देशमुख यांना मारहाणा करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नये याची जबाबदारी वकिलांची असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुरावे पाहण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती
दरम्यान, पुरावे प्राप्त झाले मात्र ते पुरावे पाहण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती. व्हिडीओचा पेन ड्राईव्ह आम्ही आरोपीच्या वकिलांना दिला असल्याची माहिती सरकारी पक्षाने सांगितले आहे. लॅपटॉप मधील डेटा आम्हाला मिळावा असे मत आरोपीचे वकीलांनी व्यक्त केले आहे. लॅपटॉप मधील पुरावे आम्ही उघडून पाहिले नाहीत, तसाच लॅपटॉप आम्ही फेरॉन्सिक लॅबकडे पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.