पहिल्या फेरीत नाकारला, पण दुसऱ्यात फेरीत नशीब फळफळलं! मुंबईचा सरफराज खान आता चेन्नईमध्ये; पृथ्व
सरफराज खान CSK पृथ्वी शॉ न विकला गेलेला IPL लिलाव 2026 मध्ये सामील झाला : आयपीएल 2026 च्या लिलावात सरफराज खानचं नशीब अखेर उजळलं आहे. पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर दुसऱ्या फेरीत चेन्नई सुपर किंग्सने सरफराज खानला 75 लाख रुपयांना आपल्या संघात सामावून घेतलं. या खरेदीमुळे सरफराजला पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.
सीएसकेमध्ये एसके! 🦁
अनबुदेंचे स्वागत आहे, सरफराज! 💛#व्हिसलपोडू #IPLAuction pic.twitter.com/LlGu9DxAn6— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) १६ डिसेंबर २०२५
सरफराज सीएसकेमध्ये, पृथ्वी शॉवर पुन्हा बोली नाही
दुसरीकडे, भारतीय क्रिकेटमधील सलामीचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉवर मात्र निराशेची छाया कायम राहिली. पहिल्या फेरीत बोली न लागल्यानंतर दुसऱ्या फेरीतही पृथ्वी शॉसाठी कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही. त्यामुळे पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अनसोल्ड राहिला.
IPL 2026 च्या लिलावात दोन सर्वोत्तम भारतीय प्रतिभावंतांना न विकता आलेले पाहणे आणि परदेशी लोक सर्व पैसे काढून घेतात ही खरोखरच दुःखाची गोष्ट आहे.
पृथ्वी शॉ आणि सरफराज खान हे खरेतर दोन जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत पण क्रिकेटच्या राजकारणामुळे त्यांना संधी मिळत नाही#IPL2026 लिलाव pic.twitter.com/JrFYvMbqNj— जितेंद्र मेघवाल (@जितेंद्र_मेघवाल) १६ डिसेंबर २०२५
सरफराज खान यापूर्वी IPL मध्ये दमदार कामगिरी करताना दिसला आहे. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्याची त्याची क्षमता आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण प्रदर्शन पाहता सीएसकेने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली सरफराजला आपली कारकीर्द नव्या उंचीवर नेण्याची संधी मिळू शकते. लिलावात एका बाजूला सरफराजसारख्या खेळाडूला संधी मिळताना दिसत असली, तरी दुसऱ्या बाजूला पृथ्वी शॉसारखा अनुभवी खेळाडू पुन्हा अनसोल्ड राहणं हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरलं आहे.
सरफराज खानला विकले आहे @ChennaiIPL INR 75 लाख साठी.#TATAIPLAuction
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) १६ डिसेंबर २०२५
दोन अनकॅप्ड खेळाडूंवर चेन्नईकडून 28 कोटींची उधळण
त्याआधी, प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे दोघेही आयपीएलमधील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत, त्यांना चेन्नईने आपल्या संघात घेतले. CSKने प्रशांत वीरला तब्बल 14.20 कोटी रुपयांना खरेदी केले. या खरेदीसह प्रशांत वीर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक किमतीचा अनकॅप्ड खेळाडू ठरला. पण काहीवेळात CSKने कार्तिक शर्मालाही 14.20 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. म्हणजे दोन्ही दोन अनकॅप्ड खेळाडूंवर चेन्नईने 28 कोटींची उधळण केली.
हे ही वाचा –
मुंबईच्या एकट्या पठ्ठ्याने सामना फिरवला! टीम इंडियाची विजयाची हॅट्ट्रिक, 408 धावांचा डोंगरासमोर, मलेशियाने गुडघे टेकले
आणखी वाचा
Comments are closed.