फलटणच्या डॉक्टर तरुणीला पोलिसांनी कसं छळलं, शेवटचा कॉल कोणाचा? स्टार्ट टू एंड स्टोरी
सातारा गुन्हे: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने (Phaltan Doctor) आपल्या हातावर काही मजकूर लिहला होता. यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) यांनी आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर हे प्रकरण नेमके काय आहे, याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. (Satara Doctor Suicide News)
पिडीत महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमधे गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते. याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या . फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणच्या शासकीय रुग्णालयात घेऊन यायचे तेव्हा पोलीसांना हवे तसे आरोपींचे वैद्यकीय अहवाल संबंधित महिला डॉक्टरकडून मिळत नसल्याने हे खटके उडत होते. यामधून संबंधित महिला डॉक्टरची तक्रार फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांनी सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित महिला डॉक्टरची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीसमोर या महिला डॉक्टरने स्वतःची बाजू लेखी स्वरुपात मांडली होती ज्यात पोलीस अधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत आणि त्याचबरोबर खासदारांचा फोन आल्याचा आणि तुम्ही बीडच्या असल्याने पोलीसांना हवे तसे फिटनेस सर्टीफीकेट देत नसल्याचा आरोप खासदारांनी केल्याचा उल्लेख आहे.
Satara News: नेमकं प्रकरण काय?
* 31 जुलै २०२५ ला फलटण पोलीस एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी फलटण रुग्णालयात घेऊन आले असता स़ंबंधित महिला डॉक्टरने त्या आरोपीचे ब्लड प्रेशर वाढलेले असल्याने त्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करुन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या आरोपीला लवकरात लवकर आपल्या ताब्यात देण्यात यावे यासाठी फलटण पोलीस आग्रही होते.
* त्यानंतर पोलीस निरिक्षक अनिल महाडीक यांनी संबंधित महिला डॉक्टरची तक्रार वैद्यकीय विभागाकडे केली.
* त्यानंतर फलटण पोलीस मल्हारी चव्हाण आणि स्वप्नील जाधव या दोन आरोपींना वैद्यकिय चाचणीसाठी घेऊन आले असता संबंधित महिला डॉक्टरने मल्हारी चव्हाणला टु डी इको टेस्ट करण्यासाठी सातारला पाठवण्याचा निर्णय दिला तर स्वप्नील जाधवची वैद्यकीय चाचणी केली.
*खासदारांचे दोन पी एस आले आणि त्यांनी खासदारांशी बोलणे करुन दीले. तुम्ही बीडचे असल्याने फीटनेस सर्टीफीकेट देत नाही असा आरोप खासदारांनी केला.
* इलेक्ट्रीक डीपी चोरीतील आरोपी ऊसतोड मुकादमाला अनफीट सर्टीफीकेट दीले. त्यामुळे पोलीस चीडले.
* 16 जुलै 2024 ला लक्ष्मी खरात या महिला आरोपीला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरुन वाद.
* गोपाळ बदने इमर्जन्सी विभागात येऊन खुर्चीवर बसुन धमकी द्यायचा.
* डॉक्टर धुमाळ यांना वारंवार सांगुनही दखल नाही.
Satara Doctor Suicide: फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेवर बीडमध्ये मूळगावी अंत्यसंस्कार
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शुक्रवार रात्री उशीरा मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली होती. याप्रकरणात पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या महिला डॉक्टरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अखेर आठ तासानंतर डॉक्टर महिलेवर वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.