फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हादरवणारे आरोप करत आयुष्य संपवलं, रणजितसिंह निंबाळकरांची पहिली प्रतिक्


फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची बातमी फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने केलेल्या आत्महत्येमुळे सध्या सातारा जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या डॉक्टर तरुणीने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील (Phaltan Suicide) एका नामांकित हॉटेलमधील खोलीत रात्री साडेदहाच्या सुमारास आत्महत्या (Suicide news) केली. या तरुणीने हातावर लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, प्रशांत बनकर आणि एका खासदाराचा उल्लेख केला होता. त्यामुळे संशयाची सुई माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्याकडे वळली होती. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना हे सर्व आरोप फेटाळून लावले. (Satara News)

फलटणध्ये घडलेली घटना ही अतिश्य निंदनीय आहे. यावरुन काही लोक गलिच्छ राजकारण करु पाहत आहेत. त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला, त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचे  संशोधन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात काही झालं तरी कुठलीही दु:खद घटना घडली राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होतात. तसंच इथं काही घडलं तरी आमच्या नावाची बदनामी करायची ही एक फलटणची अनभिषिक्त परंपरा झाली आहे. आम्ही फलटणकर याला भीक घालत नाही. भगिनीचा जीव गेल्यानंतर कोणाला यामधून राजकारण करायचं आहे तालुक्याला कळून आलं आहे. विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शुक्रवार रात्री उशीरा मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिला डॉक्टरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अखेर आठ तासानंतर डॉक्टर महिलेवर वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कवडगाव बुद्रुक गावात शोककळा पसरली होती.

Devendra Fadnavis: बलात्कारी PSI गोपाल बदने तत्काळ निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा साताऱ्याच्या एसपींना फोन

या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन करुन सविस्तर माहिती घेतली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला तात्काळ निलंबित करण्यात आले होते. गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा कर्मचारी आहे. तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर हा सामान्य नागरिक आहे. हे दोघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा

फलटणमधील महिला डॉक्टरवर पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार, शेवटचा कॉल कोणाचा, ‘तो’ खासदार संशयाच्या भोवऱ्यात, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी

आणखी वाचा

Comments are closed.