आरोपीचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला; पोलिसांनी थेट एन्काऊंटरच केला; 4 पोलीस जखमी, साताऱ्यात खळबळ

सातारा क्राइम न्यूज: सातारा (Satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहर पोलिसांवर (Satara Police) पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लखन भोसले असे एन्काऊंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. जबरी चोरी प्रकरणात लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने हल्ला केला होता. हल्ल्यात सातारा पोलीस दलातील चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे

पोलिसांनी एन्काऊंटर केलेला आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील  रहिवासी आहे. लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करुन फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले असताना ही घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Gadchiroli Naxal: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये जोरदार चकमक; कोपरशी गावात पहाटेपासून सर्च ऑपरेशन सुरु

आणखी वाचा

Comments are closed.