पायातील चप्पलीने दुकानाची फरशी घाण झाली, दुकानदाराची ग्राहकाशी झटापट, साताऱ्यात तरुणाचा मृत्यू

सातारा क्राइम न्यूज: कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानात ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीत अखिलेश नलवडे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा (Mobile Camera) व्यवस्थित नसल्याने त्याबाबतची विचारणा करण्यासाठी गेलेल्या युवकांचा वादावादीत मृत्यू (Satara news) झाला आहे. यावेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरु होते. त्यावेळी ग्राहक अखिलेश नलवडे चप्पलची घाण दुकानातील फरशीवर आल्याने वादाला सुरुवात झाली.

यावेळी दुकानातील कर्मचारी आणि  अखिलेश नलावडे यांच्यात झटापट झाली आणि अखिलेश जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर त्याची शुद्ध हरपली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे अखिलेशला मृत घोषित करण्यात आले.  या प्रकरणात पोलिसांनी  अजीम मुल्ला या तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhandara Crime: साकोलीत मध्यरात्री चोरट्यांनी फोडली पाच दुकानं

पाच दुकानांची शटर तोडून चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख लांबवल्याची घटना मध्यरात्री भंडाऱ्याच्या साकोलीत घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आता या सीसीटीव्हीच्या आधारावर साकोली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. या पाच फोडलेल्या दुकानांमध्ये मेडिकल, पेंट दुकान, किराणा दुकानाचा समावेश आहे.

Nagpur Crime: ओव्हरटेक करताना पिकअपची ट्रकला धडक बसली आणि गो तस्करी आली उघडकीस

नागपूरच्या कत्तलखान्याकडं नेण्यात येणाऱ्या 34 जनावरांची भंडाऱ्याच्या जवाहरनगर इथं सुटका करण्यात आली. छत्तीसगड येथून तीन पिकप वाहनांमध्ये कोंबून ही 34 जनावर नागपूरच्या दिशेनं मध्यरात्री भरधाव नेण्यात येत होते. भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील उड्डाण पुलावर एका ट्रकला ओव्हरटेक करताना ही पिकअप ट्रकवर धडकली. त्यानंतर ट्रक चालकासोबत वाद सुरू असताना जवाहरनगर येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते तिथं पोहोचल्यानंतर ही गो तस्करी उघडकीस आली. याप्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत तीन पिकअप मधून कत्तलखान्याकडं नेण्यात येणाऱ्या 34 जनावरांची सुटका करत तिन्ही पिकअप वाहन ताब्यात घेतले. वाहन चालकांविरोधात जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=5snrmo_ggno

आणखी वाचा

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या सोबत भिडला; वादात शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा बळी, महिला गंभीर जखमी

आणखी वाचा

Comments are closed.